विराट कोहलीने झीवासोबत केली ही धमाल मस्ती!

  ऑस्ट्रेविरूद्धच्या टी २० सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने रविवारी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Oct 8, 2017, 06:17 PM IST
विराट कोहलीने झीवासोबत केली ही धमाल मस्ती!  title=

मुंबई :  ऑस्ट्रेविरूद्धच्या टी २० सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने रविवारी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये विराट आणि महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा यांची धमालमस्ती कैद करण्यात आली आहे.

 

खूप दिवसांनी झीवा आणि माझे रियुनियन झाले आहे. आणि ही आज जो पाहिल त्याच्यासाठी खूपच खास गोष्ट  असणार आहे. असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन टी २० सामन्यांसाठी भारतीय संघ रांचीमध्ये होता. यादरम्यान विराटने झीवाची भेट घेतली. तिच्या सोबत मस्तीदेखील केली. 
 
 शनिवारी झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान भारताने टॉस जिंकला होता. त्यानुसार भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसादरम्यान  खेळ मध्येच थांबवण्यात आला. ६ ओव्हर्समध्ये ४८ धावा करण्याचे आव्हान भारतापुढे होते. 
 
 भारत ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना १० ऑक्टोबर रोजी गुवाहटीमध्ये आहे. या सामन्यातही विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे.