ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये विराटचं शानदार शतक

विराटची शानदार खेळी

Updated: Jan 15, 2019, 04:41 PM IST
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये विराटचं शानदार शतक title=

एडिलेड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या वनडेमध्ये शानदार शतक झळकावलं. मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध एडिलेड वनडेमध्ये त्याने त्याच्या वनडे करिअरमधलं ३९ वं शतक साजरं केलं. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याच्या यादीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. इनिंगच्या आठव्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर शिखर धवन आउट झाल्यानंतर विराट बॅटींग करण्यासाठी आला. यावेळी टीम इंडियाचा स्कोर ४७ रन होता.  विराटने सावध सुरुवात केली आणि ६६ बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या दरम्यान त्याने ४ फोर ठोकले. यानंतर विराटने काही शॉट्स खेळत आपलं शतक पूर्ण केलं. १०८ बॉलमध्ये त्याने आपलं हे शतक पूर्ण केलं. विराट १०४ रनवर आऊट झाला.

विराट तिसऱ्या स्थानी

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६४ शतक पूर्ण झाले आहेत. विराटने टेस्टमध्ये २५ शतक ठोकले आहेत. संगकाराच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६३ शतक आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे आता फक्त रिकी पॉटींग आणि सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर (१००) आणि रिकी पॉटींगच्या नावावर (७१) शतक आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक

खेळाडू                    टीम              सामने  शतक

१. सचिन तेंडुलकर     भारत             664   100
२. रिकी पॉटींग       ऑस्ट्रेलिया         560     71
३. विराट कोहली       भारत             360*    64
४. कुमार संगकारा    श्रीलंका           594     63
५. जॅक कॅलिस       द. आफ्रिका      519     62