खेळताना गाणी का गुणगुणायचा? विरेंद्र सेहवागनं सांगितला 'तो' किस्सा

सेहवागनं आपल्या कारकीर्दीत कसोटीत 6 दुहेरी शतके आणि वनडेमध्ये एक द्विशतक झळकावलं आहे. 

Updated: May 14, 2021, 10:54 AM IST
खेळताना गाणी का गुणगुणायचा? विरेंद्र सेहवागनं सांगितला 'तो' किस्सा title=

मुंबई: विरेंद्र सेहवागच्या आक्रमक फलंदाजीवर सगळेच फिदा होता. सचिनसोबत मिळून त्याने केलेल्या भागीदारी तर अविस्मरणीय आहेत. नजफगढ का नवाब, मुल्तान का सुल्तान अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध होता. त्याचा एक किस्सा तर खूप प्रसिद्ध आहे. 

'व्हॉट द डक'च्या मुलाखतीदरम्यान विरेंद्र सेहवागने तो किस्सा आणि त्यामगचं कारण देखील सांगितलं आहे. खेळताना विरेंद्र सेहवागला गाण गुणगुणायची सवय होती. मैदानात तो आणि सचिन खेळत असताना एकदा त्याच्या गाणं गुणगुणण्यानं सचिनला थोडं टेन्शन आलं मात्र सेहवागचं गाण म्हणणं आणि मान डोलवणं चालू होतं. 

विरेंद्र सेहवागनं त्यावर स्पष्टीकरणही देखील मजेशीर दिलं.गाणं गुणगुणलं नाही तर डोक्यात अनेक विचार येतात आणि त्यामुळे लक्षं त्या विचारांवर जातं त्यामुळे मला गाणं गुणगुणायची सवय आहे. जेव्हा रन होत नसतात तेव्हा मी भजन गुणगुणायला सुरू करतो असंही त्याने सांगितलं.

जेव्हा खेळण्यात चांगला स्पीड यायचा तेव्हा बॉलिवूडची गाणी गुणगुणायचो आणि जेव्हा रन होणं कमी होतं किंवा होतच नाहीत तेव्हा भजनाची धून गुणगुणणं सुरू असायचं असंही विरेंद्र सेहवागनं सांगितलं आहे. 

वीरेंद्र सेहवागने 104 कसोटी सामन्यांत देशासाठी 85, 86, 251 एकदिवसीय सामन्यात 8273 आणि 19 टी -20 मध्ये 394 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलचे 104 सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने 2728 धावा केल्या आहेत. सेहवागनं आपल्या कारकीर्दीत कसोटीत 6 दुहेरी शतके आणि वनडेमध्ये एक द्विशतक झळकावलं आहे.