"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी

IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे.   

Updated: Mar 21, 2023, 07:16 PM IST
 "तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी title=

Virender Sehwag on Shoaib Akhtar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरशी (Shoaib Akhtar) संबंधित एक किस्सा नुकताच शेअर केला आहे. या घटनेचा जेव्हा कधी उल्लेख होतो तेव्हा सेहवाग खासगीत जोरजोरात हसत असतात. त्यावेळी असं काही झालं होतं की, शोएब अख्तर पाय पकडून वारंवार सचिन तेंडुलकरची माफी मागत होता.

सेहवागने सांगितलं की, एका कार्यक्रमात शोएब अख्तर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण यावेळी दोघेही खेळाडू खाली कोसळले होते. या घटनेची आठवण काढताना सेहवाग उपहासात्मकपणे म्हणतो की, सचिन तेंडुलकर भारतीयांच्या अपेक्षांचं आपल्या खांद्यावर पेलत असल्याने शोएब अख्तरला ते पेलवलं नाही. 

वीरेंद्र सेहवागने न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की "लखनऊत भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंसाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अख्तरने खूप मद्यपाने केलं होतं आणि त्या अवस्थेत तो सचिन तेंडुलकरला उचलण्याचा प्रयत्न करत होता. पण तेंडुलकरचं वजन जास्त असल्याने अख्तर उचलू शकला नाही आणि त्याला घेऊन खाली पडला. ती घटना आठवल्यानंतर मला आजही हसू आवरत नाही".

या घटनेनंतर शोएब अख्तरला प्रचंड लाज वाटत होती. दुसरीकडे सेहवाग त्याला सचिनसारख्या मोठ्या खेळाडूला जखमी केलं असतंस त्यामुळे तुझं करिअर आता संपणार आहे असं चिडवत होता. सचिन तेंडुलकर याप्रकरणी बीसीसीआयकडे तक्रार करेल अशी भीती शोएबला वाटत होती आणि यामुळे तो वारंवार त्याची माफी मागत होता. 

"मी त्याला फार चिडवायचो. तू आता आऊट आहेस, तुझं करिअर संपलं आहे. तू मोठ्या खेळाडूला खाली पाडलं आहेस. त्यानंतर तो घाबरला होता. तो प्रत्येक ठिकाणी सचिनच्या मागे फिरत त्याला माफ करत म्हणत होता. तो त्याच्या पायाही पडला होती. मी आणि सचिन जेव्हा कधी एकत्र असतो तेव्हा या घटनेची आठवण काढत हसत असतो," असं सेहवागने सांगितलं. 

दरम्यान सेहवागने यावेळी भारत आणि पाकिस्तान संघ जेव्हा मैदानावर असायचा तेव्हाच कट्टर विरोधकांप्राणे खेळायचे. पण मैदानाबाहेर दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध असायचे असं सांगितलं आहे.