सेहवाग म्हणतो, कर्णधार विराट इतकाच आशिष नेहरा फिट

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने आशिष नेहराच्या निवडीवर जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. आशिष नेहरा त्याच्या फिटनेसमुळे टी-२० टीममध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

Updated: Oct 5, 2017, 09:54 AM IST
सेहवाग म्हणतो, कर्णधार विराट इतकाच आशिष नेहरा फिट title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने आशिष नेहराच्या निवडीवर जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. आशिष नेहरा त्याच्या फिटनेसमुळे टी-२० टीममध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

सेहवाग म्हणाला की, नेहरा फिटनेसच्या बाबतीत विराटपेक्षा जराही कमी नाहीये. एका टिव्ही शोमध्ये नेहराचे काही गुपितं सेहवागने उघड केली आहेत. सेहवाग म्हणाला की, ‘नेहरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरीही तो जिममध्ये जवळपास ८ तास घालवतो’.  

तो म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी-२० सामन्यासाठी नेहराची निवड झाल्याने मला जराही आश्चर्य वाटलं नाही. मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो होतो, तेव्हा मी फिटनेस बाबत जास्त सजग नव्हतो. नंतर मी फिटनेसकडे लक्ष देऊ लागलो. जर माझ्याकडे सुरूवातीच्या दिवसात ट्रेनिंगची उपकरणे असती तर, आज मी सुद्धा नेहरासारखा आत्ताही खेळत असलो असतो’.

सेहवाग म्हणाला की, नेहरा हा फास्ट बॉलर आहे. त्यामुळे त्याला धावण्याची अडचण येत नाही. या कारणानेच यो-यो टेस्टमध्ये त्याला काही अडचण आली नाही. नेहरा मुद्दाम जिममध्ये वेळ घालवत नाही. त्याला धावण्याची आणि पोहण्याची आवड आहे. युवराज सिंह आणि सुरेश रैना यो-यो टेस्ट पास करू शकले नाहीत. त्यामुळे ते टी-२० टीममध्ये नाही. 

सेहवाग म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी वयाची अट असली पाहिजे. जर नेहरा फिट आहे. रन कमी देतोय आणि विकेट घेत आहे. तर तो टीममध्ये का असू नये? ४२ वयात सनथ जयसूर्या आणि ४० वयात सचिन तेंडुलकर जर खेळू शकतात तर नेहरा का नाही? मला आनंद झालाय की, तो टीमचा भाग झालाय आणि माझी इच्छा आहे की, त्याने भविष्यातही टीममध्ये रहावं’.