भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी चाहत्यानं गायलेलं 'जन-गण-मन' व्हायरल

भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चा तर होणारच.

Updated: Sep 22, 2018, 11:32 AM IST
भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी चाहत्यानं गायलेलं 'जन-गण-मन' व्हायरल

मुंबई : सध्या सुरु असणाऱ्या आशिया कपमध्ये खेळाडूंचा सुरेख खेळ पाहायला मिळत आहेच. पण, त्यासोबतच आणखीही बऱ्याच गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने सर्वांचच लक्ष वेधत आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर तर सोशल मीडियावर या सामन्यातील विविध क्षणांच्या चर्चा होऊ लागल्या. मग ती, आपल्या सौंदर्याने अनेकांचं लक्ष वेधणारी पाकिस्तानी मुलगी असो किंवा युझवेंद्र चहल आणि उस्मान खानमधील मैत्रीपूर्ण क्षण असो. 

भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चा तर होणारच. त्यातच भर म्हणजे आता समोर आलेला आणखी एक व्हिडिओ.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी चाहता गळ्यात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज घेऊन भारताचं राष्ट्रगीत, 'जन-गण-मन' म्हणताना दिसत आहे. 

सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर व्हायरल  झालेल्या या व्हिडिओला 'व्हॉईस ऑफ राम' या पेजवरुन शेअर करण्यात आला. जो आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नागरिकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या चाहत्याचं कौतुक केल्याचंही पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेट हा खेळ या दोन देशांच्या नात्यामधील एक महत्त्वाचा दुवा असल्याचं सिद्ध होत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x