WTC 2021: विराट कोहली नको आता आम्हाला हवाय 'हा' मुंबईकर कॅप्टन

WTC 2021: विराट नको तर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण हवा?

Updated: Jun 24, 2021, 02:58 PM IST
WTC 2021: विराट कोहली नको आता आम्हाला हवाय 'हा' मुंबईकर कॅप्टन  title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट अंतिम सामन्यात किवी संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीने एकदा नाही तर 2013 नंतर ICCची ट्रॉफी मिळवण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केल्या जात आहे.

टीम इंडियाने चॅम्पियशिप ट्रॉफी गमवल्यानंतर आता सोशल मीडियावर मुंबईचा हा कॅप्टन टीम इंडियाचा कर्णधार हवा अशी मागणीच क्रिकेटप्रेमींनी लावून धरली आहे. विराट कोहली फलंदाज म्हणून कितीही उत्तम असला तरी कर्णधार म्हणून फ्लॉपच असल्याचा क्रिकेटप्रेमींचा सूर आहे. 2013 नंतर एकही ICCची ट्रॉफी मिळवण्यात यशस्वी न ठरल्यानं अखेर भारतीयांचा संताप अनावर झाला.

सोशल मीडियावर हॅशटॅग कॅप्टन्सी असा ट्रॅन्ड सुरू आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन व्हावा अशी सर्वांनी सोशल मीडियावर मागणी केली. तर धोनी देखील उत्तम कर्णधार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. विराट कोहली गेल्या काही वर्षात कर्णधार म्हणून फ्लॉप आहे. तर रवि शास्त्रींनीही टीम इंडियाच्या कोच पदावरून राजीनामा देण्याची मागणी क्रिकेटप्रेमींनी केली.

टीम इंडियाने पहिल्या डावात 217 तर दुसऱ्या डावात 170 धावा केल्या. न्यूझीलंड संघाला 139 धावांचं विजयासाठी लक्ष्य दिलं. जे अगदी सहजपणे न्यूझीलंड संघाने पूर्ण केलं. किवी संघाने 8 गडी राखून टीम इंडियाचा दणदणीत पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली.