WTC 2021: 'टीम इंडियाचे कोच रवि शास्त्रींच्या राजीनाम्याची मागणी'

 टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी आणि का केली?

Updated: Jun 24, 2021, 01:52 PM IST
WTC 2021: 'टीम इंडियाचे कोच रवि शास्त्रींच्या राजीनाम्याची मागणी' title=

मुंबई: टीम इंडियाला 8 गडी राखून न्यूझीलंड संघाने आसमान दाखवलं. त्यांचे 4 फलंदाज टीम इंडियावर भारी पडले आणि किवी संघाने चॅम्पियनशिपची ट्रॉफी पटकावली. न्यूझीलंड संघाला सोशल मीडियावर अभिनंदन करत टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांच्या राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. 

महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनशीपमध्ये टीम इंडियाने 2013मध्ये शेवटची आयसीसीची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकवली होती. त्यानंतर आतापर्यंत एकदाही टीम इंडियाला ही ट्रॉफी मिळवण्यात यश आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या क्रिकेटप्रेमींनी रवि शास्त्री यांच्य राजीनाम्याची मागणी करत आहेत.

टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर आधी चेतेश्वर पुजाराने कॅच सोडली म्हणून त्यानंतर जसप्रीत बुमराहवर संताप व्यक्त केला. इतकच नाही तर टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांनी राजीनामा देण्याची मागणीही संतप्त क्रिकेटप्रेमींनी केली. 

टीम इंडियाने पहिल्या डावात 217 तर दुसऱ्या डावात 170 धावा केल्या. न्यूझीलंड संघाला 139 धावांचं विजयासाठी लक्ष्य दिलं. जे अगदी सहजपणे न्यूझीलंड संघाने पूर्ण केलं. किवी संघाने 8 गडी राखून टीम इंडियाचा दणदणीत पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली.