सेंट जोन्स : भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. क्रिस गेल वैयक्तिक कारणांसाठी वनडे आणि टी-20 सीरिजला मुकणार आहे. गेल भारत आणि बांगलादेशच्या दौऱ्याला मुकणार आहे. पण पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी तो उपलब्ध असेल. भारताविरुद्धच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. बॅट्समन चंद्रपाल हेमराज, फेबियन ऍलन आणि फास्ट बॉलर ओशाने थॉमसला टीममध्ये घेण्यात आलंय.
कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो आणि आंद्रे रसेलचं टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं आहे. रसेल दुखापतीमुळे वनडे सीरिज खेळू शकणार नाही. कायरन पोलार्ड एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळणार आहे. सप्टेंबर 2017 मध्ये पोलार्ड शेवटची मॅच खेळला होता. टी-20 क्रिकेटचे अनुभवी खेळाडू ड्वॅन ब्राव्हो आणि सुनिल नारायणला वनडे आणि टी-20 टीममध्ये संधी मिळालेली नाही.
वेस्ट इंडिजची टीम भारताविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. यातल्या पहिल्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव झाला. दुसऱ्या टेस्टनंतर वेस्ट इंडिज भारताविरुद्ध 5 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळेल. पहिली वनडे गुवाहाटीमध्ये 21 ऑक्टोबरपासून सुरु होईल.
जेसन होल्डर (कर्णधार), फेबियन ऍलन, सुनिल अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपाल हेमराज, शिमरोन हेटमायेर, शाय होप, अलजारी जोसेफ, एव्हिन लुईस, ऍशले नर्स, कीमो पाल, रोवमेन पॉवेल, केमार रोच, मार्लोन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस
कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), फेबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायेर, एव्हिन लुईस, ओबेड मकाय, ऍशले नर्स, कीमो पाल, खारी पियरे, कायरन पोलार्ड, रोवमेन पॉवेल, दिनेश रामदिन, आंद्र रसेल, शेरफाने रदरफोर्ड, ओशाने थॉमस