Brian Lara on T20 World Cup 2024 : वर्ल्ड कप 2024 मध्ये दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली याने (Virat Kohli) एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काही मालिकेतून विराट कोहली याने ब्रेक घेतल्याने आता तो निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे का? असा सवाल विचारला जातोय. तर दुसरीकडे कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील कॅप्टन्सीच्या राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता वेस्ट इंडिजचा माजी स्टार प्लेयर ब्रायन लारा (Brian Lara) यांनी आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलंय.
भारतीय संघ टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी नक्कीच मजबूत संघ निवडेल पण तुम्ही अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. कोहली आणि रोहित यांनी टी-ट्वेंटी विश्वचषक खेळला पाहिजे आणि संघातही निवड झालीच पाहिजे, असं मत ब्रायन लारा याने म्हटलं आहे. रोहित आणि कोहलीला कॅरेबियनमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. त्यांना तिथे कसं खेळायचं हे माहित आहे. ते इथं खेळले आहेत. त्यांच्या संघातील उपस्थितीमुळे टीम इंडिया नक्कीच फायदा होईल, असं मत ब्रायन लारा याने म्हटलं आहे.
मी रोहित आणि विराट यांना म्हणेन की त्यांनी त्यांचं भविष्य स्वतःच ठरवावं. त्यांनी स्वत:साठी ध्येय निश्चित केलं पाहिजे. ते या खेळाचे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना हे माहित असलं पाहिजे. त्याला या संघासाठी आणखी काय करायचे आहे? याबाबत त्यांना नक्की माहिती असेल, असंही ब्रायन लारा यांनी म्हटलं आहे.
#WATCH | On Team India's wait for an ICC trophy getting longer, Legendary cricketer Brian Lara says, "I won't say they are struggling. They played their best cricket in the World Cup. I think what we experience is how powerful what we perceive to be failure is - which is the… pic.twitter.com/Qq2auq2gDb
— ANI (@ANI) November 26, 2023
दरम्यान, ब्रायन लारानं त्याच्या कारकिर्दीत 133 कसोटी आणि आणि 299 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटीत 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 11 हजार 953 धावा केल्या आहेत. ज्यात दोन द्विशतकाचाही समावेश आहे. त्यानं 1994 मध्ये इंग्लंडविरुद्ध 375 आणि 2004 मध्ये 400 धावांची नाबाद खेळी खेळली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. कसोटी क्रिकेटमध्ये 400 करण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे.