Hardik Pamdya Captain in SL vs IND Match : भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या 'यंगिस्तान टीम'ने 163 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंका संघाची सुरूवात खराब झाली. भर सामन्यात हार्दिक पंड्या कर्णधारपद असताना सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. असं काय झालं की सूर्याकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. (What happened in Ind vs Sl T20 Match Suryakumar Yadav became the captain latest marathi sport news)
नेमकं काय झालं?
सामन्याचं 11 वं षटक चालू असताना हार्दिक पंड्याने चेंडू हर्षल पटेलकडे सोपवला. त्यावेळी भानुका राजपक्षे आणि दसुन शनाका हे मैदानात होते. षटकामधील चौथ्या चेंडू भानुका राजपक्षेने जोरात टोलवला मात्र चेंडू सीमारेषेवर असलेल्या हार्दिक पंड्याच्या हातात जावून सामावला. 10 धावा काढून धोकादायक राजपक्षे माघारी परतला.
पंड्याने झेल घेतला मात्र त्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून आलं. पंड्या वेदनेमुळे मैदानातच खाली झोपला आणि संघातील खेळाडूही जमा झाले. स्ट्रेचिंग करूनही पंड्याचा क्रॅम्प गेला नसल्याचं दिसून आलं. शेवटी पंड्या काही वेळ बाहेर गेला, पंड्या बाहेर गेल्यावर संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सूर्याकडे गेली. सूर्या संघाचा उपकर्णधार आहे.
वर्षाच्या सुरूवातीलाच मॅचविनर फेल झालेले दिसले. भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या सामन्यात भारताचे युवा मॅचविनर फेल झालेले दिसले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर चालू असलेल्या सामन्यात टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 162/ 5 धावा केल्या. श्रीलंकेकडून मदुशनाका, तीक्ष्णा, करूणारत्ने, डिसिल्वा आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 41 धावा, इशान किशनने 37 धावा आणि अक्षर पटलने 31 धावा करत संघाच्या 162 धावा धावफलकावर लावल्या.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.