जेव्हा मयंती लँगरने लिहिले, 'हॅलो रैना, काय मला तुझा Wi-Fi पासवर्ड मिळेल?

  भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अखेरचा सामना कानपूरमध्ये खेळण्यात आला. भारताने या सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. पण मॅच दरम्यान स्टुडिओ रूममध्ये वेगळ सुरू होते. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 31, 2017, 10:02 PM IST
जेव्हा मयंती लँगरने लिहिले, 'हॅलो रैना, काय मला तुझा Wi-Fi पासवर्ड मिळेल?  title=

नवी दिल्ली :  भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अखेरचा सामना कानपूरमध्ये खेळण्यात आला. भारताने या सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. पण मॅच दरम्यान स्टुडिओ रूममध्ये वेगळ सुरू होते. 

सुप्रसिद्ध अँकर आणि स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर हा सामना कव्हर करत होती. तिने इंटरनेट वायफाय नेटवर्क सर्च करत होती. त्यावेळी सुरेश रैना याचा वायफाय नेटवर्क सर्च केला. त्यावेळी सुरेश रैनाच्या नावाने तिला वायफाय नेटवर्क मिळाले. त्याचा स्क्रिन शॉट काढून तिने ट्विटरवर शेअर केला. तसेच सुरेश रैनाला या नेटवर्कचा पासवर्ड देण्याची विनंती केली. 

मयंतीने लिहिले की, 'हॅलो रैना, काय मला तुझा Wi-Fi पासवर्ड मिळेल? 

दरम्यान, मयंतीला फलंदाज सुरेश रैनाकडून कोणतेही उत्तर आले नाही. पण सोशल मीडियावर फॅन्सने ट्विटचा पाऊस पाडला. काही मजेदार ट्विटर फॅन्सने टाकले. 

 

एक यूजर फहाद अहमद सिद्दीकीने लिहिले की, हा हा, थर्ड अंपायरकडून मागा पासवर्ड 

दरम्यान, यावेळी थर्ड अंपायर नावाचा वायफाय उपलब्ध होता. मनीष शॉने रैनाच्या फलंदाजीवर टिप्पणी करताना लिहिले की कोणताही शॉर्ट नाही प्लीज' 

रैना गेल्या दीड वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. दरम्यान मुंबईत एका प्रमोशनल इव्हेंटसाठी तो आला असता त्याला यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्याबद्दल विचारले गेले. तेव्हा तो म्हणाला, मी फिट आहे, या संदर्भात बीसीसीआयशी बोला. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी जरूर बोलेल. 

त्याला विचारले की तो पुढच्या यो-यो टेस्टमध्ये भाग घेणार तर त्यावर तो म्हणाला, तुम्ही जर बीसीसीआयला विचारले तर योग्य होईल.