मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा पुष्पा या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा होतेय. सिनेमातील डायलॉगसोबत सिनेमाची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या सिनेमातील श्रीवल्ली हे गाणेही दररोज नवे रेकॉर्ड्स बनवत असून या गाण्यातील अभिनेता अल्लू अर्जुनची हुक स्टेपही चांगलीच फेमस झालीये.
दरम्यान क्रिकेटर्स देखील या गाण्यातील ही हूक स्टेप करण्यापासून स्वतःला रोखू शकलेले नाहीत. टीम इंडियामध्ये एकत्र कमबॅक दोन खेळाडू श्रीवल्ली गाण्याची ही हूक स्टेप केली आहे. बा व्हिडीयो सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांचा आहे. क्रिकेटपटू दिसत आहेत. सूर्यकुमार यादवने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होतोय.
त्याने त्याच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे. या व्हिडीयोमध्ये सूर्यकुमार ईशानला पुष्पा म्हणतोय. शिवाय सुर्या हुक स्टेपप्रमाणे अल्लू अर्जुनसारखा चप्पल काढताना दिसतोय.
पुष्पा या सिनेमाला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हटलं जातंय. यापूर्वी भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाही अल्लू अर्जुनच्या लूकमध्ये दिसला होता. त्याचवेळी त्याने चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग 'पुष्पा पुष्पराज'वरील व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांच्याशिवाय शिखर धवन आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्यावरही पुष्पाचा फीवर दिसून आला होता.