Virat Kohli: 'मी का त्याचं अभिनंदन करू?' कोहलीच्या शतकावर कर्णधाराची वादग्रस्त प्रतिक्रिया

Virat Kohli: विराटची ही 49 वी सेंच्युरी असून यानंतर सर्व चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सेंच्युरीच्याही शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी टीमच्या कर्णधाराने, मी त्याला का शुभेच्छा देऊ, असं म्हटलंय. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 6, 2023, 12:38 PM IST
Virat Kohli: 'मी का त्याचं अभिनंदन करू?' कोहलीच्या शतकावर कर्णधाराची वादग्रस्त प्रतिक्रिया title=

Virat Kohli: 5 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचा किंग विराट कोहलीचा वाढदिवास होता. यंदाचा वाढदिवस किंग कोहलीने त्याच्या चाहत्यांसाठी एकदम खास बनवला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने सेंच्युरी झळकावली. विराटची ही 49 वी सेंच्युरी असून यानंतर सर्व चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सेंच्युरीच्याही शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी टीमच्या कर्णधाराने, मी त्याला का शुभेच्छा देऊ, असं म्हटलंय. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. 

विराट कोहलीने त्याच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त स्वतःला आणि चाहत्यांना एक खास भेट दिली. यावेळी त्याने महान सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केलीये. एकीकडे विराट कोहलीच्या ऐतिहासिक शतकाबद्दल संपूर्ण जग कौतुक करतंय, मात्र दुसरीकडे एका श्रीलंकेच्या कर्णधाराने कोहलीबाबत विचित्र विधान केलंय.

काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार?

टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा 55 रन्सवर ऑलआऊट करत पराभव केला होता. यानंतर विराने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावलं. विराट कोहलीच्या शतकावर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने प्रतिक्रिया दिलीये. 

पत्रकार परिषदेत मेंडिसला विचारण्यात आलं की, विराट कोहलीने 49 वं वनडे शतक पूर्ण केलंय. तू त्याला शुभेच्छा देशील का? यावर मेंडिसने उत्तर दिलं, 'मी त्याचं अभिनंदन का करू?' असं म्हणत मेंडिस हसायला लागला. दरम्यान श्रीलंकेच्या कर्णधाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

विराट ऐतिहासिक शतक

कोहलीने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा चाहत्यांना खूश केलं. या सामन्यात कोहलीने 101 रन्सची नाबाद खेळी केली. यावेळी विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी केलीये. सचिनला मागे टाकण्यापासून विराट आता केवळ 1 पाऊल मागे आहे. 

टीम इंडियाचा मोठा विजय

कोलकता ईडन गार्डन्सवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यावेळी फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रोहित आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये रोहित तर 11 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल देखील फिरकीच्या जाळ्यात अडकला. श्रेयस अय्यर आणि विराटने साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. अय्यरने 77 धावांची विराट खेळी केली. मात्र, विराटने शतक ठकलं. जडेजाने 15 बॉलमध्ये 29 रन्सची वादळी खेळी केली आणि टीम इंडियाला 326 रन्सवर पोहोचवलं.

भारतासमोर 327 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा टीम भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे फ्लॉप ठरली. दक्षिण आफ्रिका 27.1 ओव्हर्समध्ये केवळ 83 रन्सवर गारद झाली. भारताकडून रवींद्र जडेजाने 5, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 आणि सिराजने 1 विकेट घेतला.