धोनी-कोहली-रोहित नाही तर श्रेयस अय्यरच्या मते 'हा' सर्वश्रेष्ठ कर्णधार

श्रेयस अय्यरने ज्याला सर्वश्रेष्ठ म्हटलंय तो नेमका आहे तरी कोण? असं त्याने नेमकं केलंय तरी काय

Updated: Mar 21, 2022, 02:37 PM IST
धोनी-कोहली-रोहित नाही तर श्रेयस अय्यरच्या मते 'हा' सर्वश्रेष्ठ कर्णधार title=

मुंबई : सर्वात उत्कृष्ट कर्णधार कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर सहाजिकच अनेकांकडून महेंद्रसिंह धोनी हे उत्तर येतं. मात्र श्रेयस अय्यरने आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी एक मोठं विधान केलं आहे. त्याने केलेल्या या विधानामुळे अनेकांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या आहेत. 

श्रेयस अय्यरसाठी आवडता फलंदाज आणि सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून रोहित, विराट किंवा महेंद्रसिंह धोनी नाही. तर चक्क टीम इंडियातील स्टार फलंदाज असल्याचं सांगितलं आहे. हा स्फोटक फलंदाज कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला का आवडतो आणि त्याने असं काय केलं आहे हे आज जाणून घेऊया. 

श्रेयस अय्यरने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीनं स्थान पक्क केलं आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. कोलकाता संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे देण्यात आलं आहे. 

श्रेयस अय्यर विराट कोहली आणि रोहित शर्मा कर्णधार असताना टीम इंडियामधून खेळला आहे. मात्र त्याने आपला आवडता कर्णधार म्हणून के एल राहुलची निवड केली आहे. याबाबत श्रेयस अय्यरने एका शो दरम्यान मोठं विधान केलं. 

'के एल राहुलच्या नेतृत्वामध्ये खेळणं मला खूप आवडतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तो एक उत्तम खेळाडू आहे. मैदान आणि टीम मिटिंग्समध्ये तो कायम आत्मविश्वास ठेवतो. खेळाडूंना मनोबल देतो आणि ती गोष्ट खूप चांगली आहे. त्याची मैदानातील निर्णय घेण्याची क्षमता खूप उत्तम आहे.' 

'के एल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळताना खूप जास्त मजा येते. त्याने मला 3 ओव्हरसाठी गोलंदाजी दिली. जे यापूर्वी कोणीच केलं नव्हतं. के एल राहुल हा माझा सर्वात आवडता कर्णधार आहे', असं बोलताना यावेळी श्रेयस अय्यर बोलला आहे. 

जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे सीरिजमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तात्पुरतं कर्णधारपद के एल राहुलकडे होतं. त्यावेळी श्रेयस अय्यरने 54 धावा केल्या होत्या. 2019 नंतर अय्यरने पहिल्यांदाच या दौऱ्यात बॉलिंग केली होती.