दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये या खेळाडूंना संधी?

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Updated: Jan 4, 2018, 09:15 PM IST
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये या खेळाडूंना संधी? title=

केप टाऊन : भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या टेस्टमध्ये कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेताना विराटची डोकेदुखी वाढणार आहे. या टेस्टमध्ये भारत ६ बॅट्समन, विकेट कीपर आणि ४ बॉलर्स घेऊन खेळणार असल्याचं बोललं जातंय.

ओपनिंगला मुरली विजय, शिखर धवन आणि के.एल.राहुल यांच्यापैकी दोघांना संधी मिळणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. तर पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, सहाव्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि विकेट कीपर म्हणून वृद्धीमान सहाला संधी मिळू शकते.

रवींद्र जडेजा हा तापानं हैराण आहे, त्यामुळे आर. अश्विन हा एकमेव स्पिनर भारतीय टीममध्ये असण्याची शक्यता आहे. फास्ट बॉलर्सच्या यादीमध्ये मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाऊ शकते.

आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टीम (टेस्ट)

विराट कोहली, मुरली विजय, शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान सहा, पार्थिव पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव