आयपीएल : विराटला मिळणार एवढे पैसे, पाहा टॉप १० महागडे खेळाडू

आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Updated: Jan 4, 2018, 08:19 PM IST
आयपीएल : विराटला मिळणार एवढे पैसे, पाहा टॉप १० महागडे खेळाडू title=

मुंबई : आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. २७ आणि २८ जानेवारीला आयपीएल खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्याआधी कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करणं टीमना बंधनकारक होतं.

विराट कोहली सगळ्यात महागडा खेळाडू

आयपीएल टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला सगळ्यात जास्त पैसे मिळाले आहेत. आरसीबीनं तब्बल १७ कोटी रुपये देऊन कोहलीला कायम ठेवलं आहे. कोहलीबरोबरच आरसीबीनं एबी डिव्हिलियर्सला ११ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं.

चेन्नईच्या टीमनं धोनीला १५ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं आहे. तर सुरेश रैनाला ११ कोटी आणि जडेजाला ७ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

टॉप १० महागडे खेळाडू

विराट कोहली- १७ कोटी रुपये

एम.एस.धोनी- १५ कोटी रुपये

रोहित शर्मा- १५ कोटी रुपये

डेव्हिड वॉर्नर- १२.५ कोटी रुपये

स्टिव स्मिथ- १२ कोटी रुपये

सुरेश रैना- ११ कोटी रुपये

एबी डिव्हिलियर्स- ११ कोटी रुपये

हार्दिक पांड्या- ११ कोटी रुपये

सुनील नारायण- ८.५ कोटी रुपये

भुवनेश्वर कुमार- ८.५ कोटी रुपये

टीमनी कायम ठेवले हे खेळाडू

मुंबई : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या

चेन्नई : धोनी, रैना, जडेजा

बंगलोर : कोहली, एबी डिव्हिलियर्स, सरफराज

दिल्ली : मॉरिस, पंत, अय्यर

कोलकाता : सुनिल नारायण, आंद्रे रसेल

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार

राजस्थान : स्टिव्ह स्मिथ

पंजाब : अक्सर पटेल

राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय?

मुंबई इंडियन्सनं पोलार्डला टीममध्ये कायम ठेवलं नाही तर त्याला आयपीएलच्या लिलावाला सामोरं जावं लागेल. या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं पोलार्डला ८ कोटी रुपयांना विकत घेतलं तर मुंबई इंडियन्स राईट टू मॅच कार्डचा वापर करून पुन्हा पोलार्डला टीममध्ये घेऊ शकतं. २७ आणि २८ जानेवारीला आयपीएल खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावामध्ये टीमना जास्तीत जास्त दोन राईट टू मॅच कार्ड वापरता येतील.