विम्बल्डन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाचा विजय

३४ वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनच्या टेनिसपटूनं विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद झाली असून द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला दे धक्का दिला.

Reuters | Updated: Jul 12, 2017, 08:01 AM IST
विम्बल्डन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाचा विजय title=
छाया सौजन्य : रॉयटर

विम्बल्डन : ३४ वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनच्या टेनिसपटूनं विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद झाली असून द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला दे धक्का दिला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना कोंटाने ६-७ (२-७), ७-६ (७-५), ६-४ अशी बाजी मारली. सेमीफायनलमध्ये आता कोंटापुढे बलाढ्य व्हिनस विलियम्सचं तगडं आव्हान असेल. सध्या व्हिनसचा फॉर्म पाहता कोंटाला सेमीफायनलमध्ये विजय मिळवणे अत्यंत अवघड जाईल. 

हालेपने सामन्यात आश्वासक सुरुवात करताना पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होतली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये कोंटाने दमदार पुनरागमन करताना टायब्रेकमध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणला. यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये आक्रमक खेळ करताना कोंटाने हालेपचे आव्हान मोडून काढत दिमाखात सेमी फायनल गाठली.