World Cup 2019 : टीम इंडियाकडून कांगारूंची धुलाई, ऑस्ट्रेलियाला ३५३ रनचं आव्हान

टीम इंडियाच्या बॅट्समननी कांगारूंच्या बॉलरची जबरदस्त धुलाई केली आहे. 

Updated: Jun 9, 2019, 07:04 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाकडून कांगारूंची धुलाई, ऑस्ट्रेलियाला ३५३ रनचं आव्हान title=

लंडन : टीम इंडियाच्या बॅट्समननी कांगारूंच्या बॉलरची जबरदस्त धुलाई केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ३५२/४ एवढा स्कोअर केला. शिखर धवनने १०९ बॉलमध्ये ११७ रनची खेळी केली. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये १२७ रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा ७० बॉलमध्ये ५७ रन करून आऊट झाला.

रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीबरोबरही पार्टनरशीप केली. शिखर धवनची विकेट गेल्यानंतरही टीम इंडियाने फटकेबाजी सुरूच ठेवली. विराट कोहली ७७ बॉलमध्ये ८२ रन करून आऊट झाला. तर हार्दिक पांड्याने २७ बॉलमध्ये ४८ रन केले आणि धोनीला १४ बॉलमध्ये २७ रन करण्यात यश आलं. केएल राहुलने ३ बॉलमध्ये नाबाद ११ रनची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याच बॉलरला चमकदार कामगिरी करता आली नाही. मार्कस स्टॉयनिसने ७ ओव्हरमध्ये ६२ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि नॅथन कुल्टर नाईलला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

p>