close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शेरास सव्वाशेर! शिखर धवनच्या मुलाची फटकेबाजी

नेटकरी म्हणतात, अरे हा तर....

Updated: Jun 16, 2019, 09:46 AM IST
शेरास सव्वाशेर! शिखर धवनच्या मुलाची फटकेबाजी
इन्स्टाग्राम व्हिडिओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : World Cup 2019 इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता खेळाडू मोठ्या उत्साहात असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी खेळल्यानंतर शिखर धवनला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागत आहे. पण, तो लवकरच संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत असेल हेसुद्धा तितकच खरं. सध्याच्या घडीला शिखर संघाबाहेर असला तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि एकंदर क्रिकेट वर्तुळातील वावरण्यातून मात्र तो सर्वांसोबतच असल्याचं नाकारता येत नाही. 

शिखरने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान शिखर त्याच्या मुलासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट खेळाडू रोहित शर्मासुद्धा दिसत आहे. या दोन्ही खेळाडूंची एकत्र उपस्थिती पाहता सूत्रसंचालक गौरव कपूर शिखरच्या मुलाला एक प्रश्न विचारत आहे. 

'सर्वात चांगला फलंदाज कोण, तू की तुझे बाबा?', गौरवने दिलेल्या या दोन्ही पर्यायांची तमा न बाळगता शिखरच्या मुलाने सर्वात चांगला फलंदाज रोहित असल्याचं म्हणत त्याच्याकडे इशारा केला. त्याचं हे उत्तर पाहून शिखर, रोहित आणि गौरवला हसू आवरता आलं नाही. हाच व्हिडिओ पोस्ट करत शिखरने लिहिलं, 'बाप शेर तो बेटा सव्वाशेर'. त्याचं हे कॅप्शन पाहता शिखरचं हे कॅप्शन भारत- पाकिस्तान सामन्याशीही काहींनी त्याचा संबंध लावला आहे.

शिखरने हे कॅप्शन नेमकं कोणत्या आशयाने लिहिल हे तर फक्त शिखरच जाणतो. त्यामुळे ही गोष्ट सर्वस्वी त्याच्यावर सोपवून नेटकरी मात्र त्याच्या मुलाचंच कौतुक करण्यात मग्न झाले आहेत.