World Cup 2019 : टीम इंडियासाठी 'विकेट फिक्सिंग'चा आरोप, शोएब अख्तर म्हणतो...

वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेटने पराभव केला.

Updated: Jun 6, 2019, 05:52 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियासाठी 'विकेट फिक्सिंग'चा आरोप, शोएब अख्तर म्हणतो... title=

साऊथम्पटन : वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेटने पराभव केला. यानंतर टीम इंडियासाठी पिच फिक्सिंग केल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. या सगळ्या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने उडी घेतली आहे. शोएबने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकून हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाला शोएब?

या व्हिडिओमध्ये शोएब म्हणाला 'टीम इंडिया आपल्या मर्जीनुसार वर्ल्ड कपमध्ये विकेट बनवत आहे. भारतामधून ८० ते ९० टक्के पैसा येतो, यामध्ये टीव्ही राईट्सचाही समावेश आहे. याचा वापर भारत आपल्याला हव्या तशा खेळपट्ट्या बनवण्यासाठी करत आहे, अशी अफवा मी ऐकली आहे. पण टॉस तर भारताच्या हातात नाही ना? टॉस फॅफ डुप्लेसिस जिंकला. दक्षिण आफ्रिकेला नेमकं काय झालं आहे. त्यांच्या टीमला दुखापतींनी ग्रासलं आहे बॉलिंगमध्येही अडचणी आहेत. पण ते ५० ओव्हर तर पूर्ण खेळू शकत होते. कमीत कमी २७५-२८० स्कोअर करू शकत होते?'

या व्हिडिओमध्ये पुढे शोएब म्हणाला, 'वर्ल्ड कप दुसऱ्या देशात होत आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. आयसीसीच्या नियमांनुसार वर्ल्ड कप होत आहे. भारतामध्ये वर्ल्ड कप नाहीये. इंग्लंडचे क्युरेटर कोणाचंच ऐकत नाहीत. ते नियम पाळतात. टीम इंडिया आपल्या सामर्थ्यामुळे जिंकली दक्षिण आफ्रिकेपेक्षा ते चांगलं खेळले. आफ्रिका खूप खराब खेळली. विराटला भुवनेश्वरवर विश्वास आहे. बुमराह, भुवनेश्वर, कुलदीप, चहल हे सगळे सर्वोत्तम बॉलर आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला रन करता आले नाहीत. खेळपट्टीवरून जी अफवा पसरवली जात आहे, त्याला मी पाठिंबा देत नाही.'