World Cup 2019: इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका

दक्षिण आफ्रिकेसाठी बॅडन्यूज

Updated: Jun 3, 2019, 07:05 PM IST
World Cup 2019: इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका title=

नॉटिंग्हम : वर्ल्डकपमधील टीम इंडियाची पहिली मॅच ५ जूनला खेळण्यात येणार आहे. ही मॅच दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळली जाणार आहे. याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. आफ्रिकेचा वेगवान बॉलर लुंगी एन्गिडी दुखापत झाली आहे. त्यामुळे तो इंडिया विरुद्ध खेळू शकणार नाही.

एन्गिडी खेळणार नसल्याची माहिती टीम मॅनेजमेंटने दिली आहे. आफ्रिकेने वर्ल्डकपमधील पहिली मॅच बांग्लादेश विरुद्ध खेळली. यामध्ये आफ्रिकेचा पराभव झाला. या मॅचमध्ये एन्गिडीला दुखापतीमुळे केवळ ४ ओव्हरच टाकत्या आल्या.

एन्गिडीला हॅमस्टि्ंगचा त्रास असल्याने त्याला बॉलिंग करताना त्रास होत आहे. एन्गिडीच्या दुखापतीवर सोमवारी उपचार करण्यात येणार आहे. सध्याची दुखापत पाहता तो निदान ७-१० दिवस खेळू शकणार नाही. अशी माहिती टीम आफ्रिकेचे डॉक्टर मोह्म्मद मूसा यांनी दिली आहे.  एन्गिडीच्या दुखापतीमुळे बांगलादेश विरुद्ध त्याला जास्त ओव्हर टाकू दिल्या नाहीत. असं देखील मूसा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी यंदाच्या वर्ल्डकपमधील सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्याच मॅचमध्ये यजमान इंग्लंड आणि नंतर बांग्लादेशकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन पराभवामुळे आफ्रिकेवर चांगलाच दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ५ जूनला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये आफ्रिकेवर आणखी दबाव असणार आहे.