World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

क्रिकेटच्या महायुद्धाला म्हणजेच वर्ल्डकप स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. 

Updated: May 30, 2019, 03:42 PM IST
World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय title=

लंडन : क्रिकेटच्या महायुद्धाला म्हणजेच वर्ल्डकप स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कपमधील पहिली मॅच यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या टीममध्ये आतापर्यंत एकूण ५९ मॅच खेळण्यात आले आहेत. या ५९ मॅचपैकी इंग्लंडने २६ मॅच जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने २९ विजय मिळवला आहे. एक मॅच ही बरोबरीत सुटली तर ३ मॅचचे निकाल लागला नाही. वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम ६ वेळा समोरसमोर भिडल्या आहेत. यापैकी प्रत्येकी ३ सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत.

इंग्लंडची टीम

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इओन मॉर्गन (कर्णधार), जॉस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, आदिल रशीद, लियाम प्लंकेट, जोफ्रा आर्चर

दक्षिण आफ्रिकेची टीम

हाशिम आमला, क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, फॅफ डुप्लेसिस (कर्णधार), रसी वॅनडर डुसेन, जेपी ड्युमिनी, ड्वॅन प्रिटोरियस, एन्डिल पेहलुक्वायो, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा