कार्डिफ : वर्ल्डकप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्डकपमधील पहिली मॅच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात येणार आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत आपला एकतरी फोटो असावा, अशी प्रत्येक क्रीडाप्रेमीची इच्छा असते. ही इच्छा आता पूर्ण होणार आहे.
क्रिकेटचाहत्यांना वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसोबच फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. परंतु हा खुद्द विराट नसून त्याचा मेणाचा पुतळा असणार आहे. विराट कोहलीच्या पुतळा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आणण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण बुधवारी (२९ मे) मादाम तुसाद संग्राहालयाकडून करण्यात आले.
क्रिकेट चाहत्यांना या पुतळ्यासोबत आजपासून ते वर्ल्डकप संपेपर्यंत म्हणजेच ३० मे पासून १५ जुलैपर्यंत फोटो घेता येणार आहे. कोहलीचा हा पुतळा मादाम तुसाद संग्राहालयात ठेवण्यात येणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धा पुढील ५० दिवस चालणार आहे. त्यामुळे क्रिकेच प्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. वर्ल्डकप निमित्त अनेक क्रिकेटप्रेमी इंग्लंडमध्ये उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कोहलीच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. असे मादाम तुसादचे मॅनेजर स्टिव्ह डेविस म्हणाले. तसेच क्रिकेट मॅचसोबत चाहते हा पुतळा पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात येतील. असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केली.
विराटचा पुतळा हा हातात बॅट घेऊन भारताची मर्यादीत षटकांच्या क्रिकेटची जर्सी घातलेला असून या पुतळ्यासाठी खूद्द विराटनेच त्याचे शूज आणि ग्लव्हज दिले आहेत.
विराटचा हा पुतळा मेणापासून बनवला आहे. विराटच्या या पुतळयाला टीम इंडीयाची ब्लू जर्सी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुतळ्यासाठी विराटने आपल्या वापरातील ग्लव्हज आणि शूज देखील दिले.
विराटच्या या पुतळ्या आधी मादाम तुसाद संग्राहालयात अनेक खेळाडूंचे पुतळे ठेवण्यात आले. यात महाने क्रिकेटर सचिन तेंडुलकर, उसेन बोल्ट आणि सर मोहम्मद फराह यांचे पुतळे देखील आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या रांगेत विराटच्या पुतळ्याला मानाचे स्थान मिळाले आहे.
Wax statue of Indian cricket team captain #ViratKohli to be unveiled shortly at Madame Tussauds, #Delhi. pic.twitter.com/kfxeM0Zpvo
— ANI (@ANI) June 6, 2018
Wax statue of Indian cricket team captain #ViratKohli to be unveiled shortly at Madame Tussauds, #Delhi. pic.twitter.com/kfxeM0Zpvo
— ANI (@ANI) June 6, 2018