World Cup 2019 : टीम इंडियाची मधली फळी पुन्हा गडगडली, कोहली-धोनीने सावरलं

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची मधली फळी पुन्हा गडगडली आहे. 

Updated: Jun 27, 2019, 07:08 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाची मधली फळी पुन्हा गडगडली, कोहली-धोनीने सावरलं title=

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची मधली फळी पुन्हा गडगडली आहे. कोहली आणि धोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाने २६८ रन केले आहेत. एमएस धोनीने ६१ बॉलमध्ये नाबाद ५६ रन केले, यामध्ये ३ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. कर्णधार विराट कोहलीने ८२ बॉलमध्ये ७२ रन केले. विराटने त्याच्या खेळीमध्ये ८ फोर लगावले.

या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. स्कोअरबोर्डवर २९ रन असताना रोहित शर्मा (१८) आऊट झाला. यानंतर विराट आणि राहुलने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राहुल पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर माघारी परतला. राहुलने ६४ बॉलमध्ये ४८ रन केले.

राहुलची विकेट गेल्यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर यांच्या रुपात टीम इंडियाला लागोपाठ दोन धक्के लागले. शेवटच्या काही ओव्हरमध्ये हार्दिक आणि धोनीने फटकेबाजी केल्यामुळे टीम इंडियाला २६८ रनपर्यंत मजल मारता आली. हार्दिकने ३८ बॉलमध्ये ४६ रन केले.

वेस्ट इंडिजकडून केमार रोचने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर आणि शेल्डन कॉट्रेलला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.

या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अजून एकही मॅच हरलेली नाही. वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच न गमावलेली टीम इंडिया एकमेव आहे. आजची मॅच जिंकल्यास टीम इंडिया वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये प्रवेशाच्या आणखी जवळ जाईल. १२ पॉईंट्स असलेली ऑस्ट्रेलिया याआधीच सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे ९ पॉईंट्स आहेत. ५ पैकी ४ मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली.