इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Updated: Sep 26, 2023, 07:04 PM IST
इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!' title=
World cup 2023 babar azam

Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. सर्वात खरी मजा येईल ती 14 ऑक्टोबर रोजी... या दिवशी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK, World Cup) यांच्यात सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी आख्खं जग वाट बघतंय. अशातच भारतात पाऊल ठेवण्याआधी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Babar Azam ?

भारतात येण्यापूर्वी बाबर आझमने माध्यमांशी संवाद साधला. केवळ भारतच नाही तर आमच्या सर्व सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत. आमच्या बहुतेक चाहत्यांना व्हिसा मिळाला नसला तरी ते गप्प बसणार नाहीत. त्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला, असं वक्तव्य बाबर आझमने केलं आहे. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक चाहते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे मी तिथे खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन, असं वक्तव्य बाबर आझमने केलं आहे.

आम्हाला मागील कामगिरीची चिंता नाही. प्रत्येकजण चांगली कामगिरी करेल आणि निकालही चांगला लागेल. यापूर्वीही आम्हाला भारतात खूप पाठिंबा आणि प्रेम मिळालं, आता देखील वर्ल्ड कपमध्ये आम्हाला सपोर्ट मिळेल, अशी आशा बाबर आझमने व्यक्त केली आहे. पाकिस्तानी टीमला व्हिजा मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. परंतू आता पाकिस्तानी फॅन्सला व्हिजा मिळणार की नाही? हे पहावं लागणार आहे.

आणखी वाचा - 'MS Dhoni ने वर्ल्ड कप जिंकला नव्हता तर...', Mr. 360 ने मिसळला गंभीरच्या सुरात सूर

दरम्यान, आशिया कपमध्ये (Asia Cup) टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला होता. त्यामुळे रोहित अँड कंपनी वर्ल्ड कपमध्ये आत्मविश्वासाने उतरेल, यात काही शंकाच नाही. बाबर आझम देखील वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये येऊ शकतो, असं दिसतंय. भारतीय पिचवर पाकिस्तानची नेहमी नाचक्की झालीये. त्यामुळे आता यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.