World Cup Sanju Samson Joins Team India: आजपासून भारतामध्ये क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी सर्व देशांच्या कर्णधारांचे विशेष फोटोशूट पार पडले. काही दिवसांपूर्वीच वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यावेळी संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे. मात्र आता संजू सॅमसन संघाबरोबर जोडला गेला आहे. संजूनेच सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर करताना कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे तर उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आहे. याशिवाय संघामध्ये के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा या फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर भारतीय गोलंदाजीची धुरा आर. अश्वीन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. या संघामधून युजवेंद्र चहल आणि संजू सॅमसनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या दोघांना वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया नोंदवत आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आता वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना संजू सॅमसनचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकपसंदर्भातच हे नाव चर्चेत आलं असून यासाठी कारणीभूत ठरत आहे त्याने केलेली एक पोस्ट.
नक्की वाचा > 'खेळाडूंना बीफ मिळालं नाही तर पाकिस्तान वर्ल्डकपचे सामने जिंकू शकणार नाही, हा भारताचा कट'
संजू सॅमसन हा वर्ल्डकपचे सामने सुरु होण्याच्या काही दिवसआधीच भारतीय संघाबरोबर जोडला गेला आहे. भारतीय संघाच्या सरावादरम्यान संजू दिसून आला. त्यानेच एक फोटो शेअर करत, "देवांची भूमी अशी ओळख असलेल्या प्रदेशात भारतीय संघाबरोबर..." अशी कॅप्शन दिली आहे. खरं तर तुम्ही विचार करतायं त्याप्रमाणे काही घडलेलं नाही. संजू सॅमसन प्रत्यक्षात मैदानात उतरणार नाही किंवा तो सरावही करत नव्हता. तर भारतीय संघ केरळमध्ये जिथे सराव करत होता त्या ठिकाणी सरावाच्या मैदानाच्या मागील बाजूस संजू सॅमसनचं मोठं चित्र रेखाटण्यात आलं होतं. या चित्रासमोरच सरावचं पीच असल्याने भारतीय खेळाडू एका अर्थाने आपल्या समोर आणि आपल्याबरोबरच सराव करत होते अशा अर्थाने संजूने हा फोटो पोस्ट केला आहे.
नक्की वाचा >> World Cup Schedule: मुंबई, पुण्यातही सामने! कोणत्या तारखेला, कोणत्या मैदानात, कोणाविरुद्ध खेळणार टीम इंडिया
संजूने पोस्ट केलेल्या या फोटोला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले आहेत. 7 लाखांहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले असून साडेसहा हजारांच्या आसपास कमेंट्स या फोटोवर करण्यात आलेल्या आहेत.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.