Ind vs Nz : न्यूझीलंडविरुद्ध चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघाचा प्लॅन तयार

World Cup 2023 Ind vs Nz Semi Final : 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. नऊ सामने जिंकून भारतीय संघ फॉर्मात आहे. मात्र न्यूझीलंडच्या खेळीमुळे भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 13, 2023, 11:25 AM IST
Ind vs Nz : न्यूझीलंडविरुद्ध चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघाचा प्लॅन तयार title=
(फोटो सौजन्य - Reuters)

IND VS NZ : भारतीय संघाने रविवारी वर्ल्डकप 2023 च्या 45 व्या सामन्यात (World Cup 2023) नेदरलँड्सचा 160 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा स्पर्धेतील हा सलग नववा विजय ठरला. भारत (Indian Cricket Team) या स्पर्धेतील असा एकमेव संघ आहे जो आतापर्यंत एकही सामना हारलेला नाही. हा सामना संपल्याने या वर्ल्डकपमधील नेदरलँड्सचे आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत नेदरलँडच्या संघाने चमकदार कामगिरी केली. आता सेमीफायनलमध्ये भारताची लढत बलाढ्य अशा न्यूझीलंडसोबत होणार आहे. न्यूझीलंडचा वर्ल्डकपमधील फॉर्म पाहता किवी संघाला नमवणं भारतीय खेळाडूंना कठीण जाण्याची शक्यता आहे. मात्र फॉर्मात असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादवने (kuldeep yadav) संघाच्या संघाच्या रणनीतीबद्दल भाष्य केले आहे.

भारतीय संघाने आपल्या सर्व साखळी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून वर्ल्डकप 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने 9 सामन्यांत 9 विजय मिळवले आहेत. आता न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आता 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

"वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजी करणं अवघड आहे. बाऊन्स चांगला असल्याने तिथे फलंदाजांचे वर्चस्व असतं. मात्र, वनडे फॉरमॅटमध्ये गोलंदाजाकडे पुनरागमन करण्याची वेळ आहे. पण हो, खेळात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी तुम्हाला लवकर विकेट्सची आवश्यकता असेल, तरच तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकाल," असे कुलदीप यादव म्हणाला.

"न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप 2019 च्या उपांत्य फेरीला चार वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आम्ही न्यूझीलंडविरुद्ध अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. दोन्ही संघांना भारतीय परिस्थितीची चांगलीच जाण आहे. पण आमची तयारी चांगली आहे. आम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला आणि उपांत्य फेरीतही तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करू," असेही कुलदीप म्हणाला.

रोहित शर्मा मॅचनंतर काय म्हणाला?

"ड्रेसिंग रूममध्ये चांगलं वातावरण तयार करण्यासाठी चांगले परिणाम आवश्यक आहेत. मात्र, ड्रेसिंग रुमचे वातावरण चांगले ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. आमच्या खेळाडूंमध्येही खूप चांगले संबंध आहेत. आज अनेक वेगवेगळ्या खेळाडूंनी गोलंदाजी केली. आम्ही सहाव्या गोलंदाजाचा विचार करत होतो. आम्ही बॉलिंग युनिट म्हणून खूप काही करण्याचा प्रयत करत होतो. वाइड यॉर्कर्सची गरज नसताना आमचे गोलंदाज वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होते. पुढील तयारीसाठी हे सगळं करत होतो," असे रोहित शर्मा म्हणाला.