IND vs NZ : 'मी घाबरलो होतो, पण संध्याकाळी जेव्हा...', Mohammed Shami ने सांगितलं घातक गोलंदाजीचं सिक्रेट!

Mohammed Shami On Semi Final match : शमीच्या घातक गोलंदाजीने सर्वांना पुन्हा एकदा आनंदोस्तव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, शमीने किवींचा काटा कसा काढला? त्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Nov 15, 2023, 11:55 PM IST
IND vs NZ : 'मी घाबरलो होतो, पण संध्याकाळी जेव्हा...', Mohammed Shami ने सांगितलं घातक गोलंदाजीचं सिक्रेट! title=
Mohammed Shami World Cup 2023

World Cup 2023 Mohammed Shami : वानखेडेवर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सामन्यात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सत्ता गाजवली आहे. शमीने या सामन्यात 7 विकेट्स घेत अनेक वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड उद्धवस्त केले आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करताना 398 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला 327 धावांवर रोखलं. त्यामुळे आता टीम इंडियाने फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो मोहम्मद शमी... शमीच्या घातक गोलंदाजीने सर्वांना पुन्हा एकदा आनंदोस्तव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, शमीने किवींचा काटा कसा काढला? त्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.

काय म्हणाला Mohammed Shami?

मी वर्ल्ड कपपूर्वी वनडे क्रिकेट फार कमी खेळलो होतो. वर्ल्ड कपआधी मला संधी मिळाली नसल्याने माझ्या वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा मावळल्या होत्या. मी माझ्या संधीची वाट पाहत होतो. न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला येथे माझं पुनरागमन झालं अन् माझ्या सरावाचा फायदा मला झाला. माझा विश्वास आहे की, नवीन चेंडूने विकेट मिळवणं हे महत्वाचं असतं. मी विल्यमसनचा झेल सोडला. त्यावेळी मी घाबरलो होतो. सामना हातातून गेल्यासारखं वाटत होतं. मात्र, मी बॉलिंगवर लक्ष केंद्रित केलं अन् मला त्याचा फायदा झाला, असं मोहम्मद शमी याने म्हटलं आहे.

सामन्याचं पीच हे फलंदाजासाठी चांगलं होतं. कारण दुपारी चांगल्या धावा निघत होत्या. संध्याकाळी दव पडल्यामुळं फलंदाजीसाठी पोषक वातावरण होतं. खेळाडूंना फटके मारण्यासाठी पुढे आणून विकेट्स मिळवायची असते, याचा प्रयत्न मी आजच्या सामन्यात केला. गेल्या दोन्ही सेमी फायनलमध्ये आम्ही पराभूत झालो होतो, मात्र यावेळी सर्वकाही सर्वस्व पणाला आम्ही लावलं होतं. आम्ही शेवटपर्यंत हा सामना सोडला नाही आणि त्यामुळेच आम्ही फायनलमध्ये पोहोचू शकलो, असं म्हणत शमीने विजयाचं सुत्र मांडलं आहे.

दरम्यान, एकाच वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम देखील त्याने आपल्या नावावर केला आहे. झहीर खान याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, आता शमीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 22 विकेट्स नावावर केल्या आहेत. फायनलमध्ये देखील शमीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवेल, यात काही शंका नाही.