पाकिस्तान-नेदरलँड सामन्यात धक्कादायक प्रकार, 30 मिनिटं कोणाच्याही लक्षात नाही आलं; PHOTO व्हायरल

वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा तब्बल 81 धावांनी मोठा पराभव केला. दरम्यान या सामन्यातील एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2023, 12:57 PM IST
पाकिस्तान-नेदरलँड सामन्यात धक्कादायक प्रकार, 30 मिनिटं कोणाच्याही लक्षात नाही आलं; PHOTO व्हायरल title=

वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँड संघ आमने-सामने होते. हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात तुलनेने छोटा संघ असणाऱ्या नेदरलँडने पाकिस्तान संघाला चांगली झुंज दिली. प्रथम गोलंदाजी करताना नेदरलँडने पाकिस्तान संघाला 49 ओव्हर्समध्ये 286 धावांवर सर्वबाद केलं. पण पाकिस्तानने या सामन्यात पुनरागमन करत नेदरलँडला फक्त 205 धावात रोखलं. पाकिस्तानने हा सामना 81 धावांनी जिंकत वर्ल्डकपमधील आपल्या विजयाची नोंद केली. 

दरम्यान या सामन्यातील एका घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याचं कारण पाकिस्तानचा एक खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी बाऊंड्री लाईनवर उभा होता. पण यावेळी ही बाऊंड्री लाईन मागे सरकलेली होती. यामुळे बाऊंड्री लाईनचं अंतर वाढलं होतं. तब्बल 30 मिनिटं ही बाऊंड्री लाईन अशीच होती. 

आता हे एखाद्या खेळाडूने जाणुनबुजून केलं की क्षेत्ररक्षण करताना किंवा चौकार वाचवताना खेळाडूकडून ती मागे ढकलली गेली हे स्पष्ट झालेलं नाही. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यादरम्यान काह युजर्सनी खेळाडूने बाऊंड्री लाईनशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. तर काहींच्या मते क्षेत्ररक्षण करताना एखाद्याने उडी मारली असता ही लाईन मागे सरकली असावी.

पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

पाकिस्तानचा पहिला सामना अंडरडॉग असणाऱ्या दुबळ्या नेदरलँड संघाशी झाला. यावेळी नेदरलँडच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना पार पडला. 

नेदरलँडने गोलंदाजी करताना सुरुवातीला जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानचे सुरुवातीचे तीन विकेट्स घेत त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पण नंतर पाकिस्तानी फलंदाजांनी डाव सावरला. पाकिस्तान संघ 286 धावांवर ऑल आऊट झाला. 

नेदरलँडने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. पण एका बाजूने त्यांचे विकेट्स जात होते. अखेर 205 धावांवर सर्व संघ बाद झाला. पाकिस्तानने 81 धावांनी हा सामना जिंकला.