भारत-पाकिस्तान मॅचच्या नावाखाली BJP ने 40,000 महिलांना मोफत वाटली Eng Vs NZ मॅचची तिकीटं; पण...

40000 Women Got Free Tickets: न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील अनेक स्टॅण्ड रिकामेच होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 6, 2023, 09:58 AM IST
भारत-पाकिस्तान मॅचच्या नावाखाली BJP ने 40,000 महिलांना मोफत वाटली Eng Vs NZ मॅचची तिकीटं; पण... title=
या महिलांनीच केला यासंदर्भातील खुलासा

40000 Women Got Free Tickets: वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना गुरुवारी अहदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. मात्र वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्याला अपेक्षित गर्दी मैदानात पाहायला मिळाली नाही. यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता या सामन्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदाबाद आणि आजूबाजूच्या परिसरामधील तब्बल 40 हजार महिलांना अहमदाबादमधील पहिल्या सामन्याची मोफत तिकीटं वाटण्यात आली होती. या महिलांना जेवणाची तिकीटंही वाटण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे क्रिकेटमध्ये फारसा रस नसणाऱ्या या महिलांना आज भारत आणि पाकिस्तानचा सामना आहे असं सांगण्यात आलं होतं. 

भाजपाने मोफत वाटली तिकीटं...

'एशियन न्यूज टीव्ही'ने अहमदाबादच्या मैदानाबाहेर काही महिला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. यावेळेस या महिलांनी आपल्याला आज इंग्लंड आणि न्यूझीलंडचा सामना आहे याची कल्पना नव्हती असं सांगितलं आहे. पहिला सामना पाहण्यासाठी आलेल्या या महिलांना आज भारत आणि पाकिस्तानचा सामना असल्याचं सांगण्यात आलेलं. आम्हाला भारत पाकिस्तान सामना आहे असं सांगून तिकीटं देण्यात आली होती, असं एक महिला व्हिडीओ सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे 40 हजार मोफत तिकीटं गुजरातमधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वाटल्याचंही समोर आलं आहे. या महिलांनीही आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तिकीटं आणि खाण्याची कुपन दिल्याचं म्हटलं आहे. एशियन नेट टीव्हीने त्यांच्या युट्यूबला हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

व्हायरल झाले रिकाम्या स्टॅण्डचे फोटो अन् या महिलांचे व्हिडीओ

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील रिकाम्या स्टॅण्डचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर महिला प्रेक्षकांना खोटं सांगून या सामन्याची तिकीटं देण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. भारत-पाकिस्तान मॅचच्या नावाखाली भाजपाने 40,000 महिलांना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मॅचची तिकीटं मोफत वाटली तरीही मैदान रिकामेच दिसून आले. याची चर्चा सोशल मीडियावरही होती. पाहूयात काही ट्वीट्स...

1)

2)

3)

न्यूझीलंडने सहज जिंकला सामना...

दरम्यान, सामना सुरु असताना रिकामे स्टॅण्ड पाहून सामन्यातील समालोचक आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हे मैदानात रिकामं वाटत असलं तरी आज 30 हजारांच्या आसपास प्रेक्षक उपस्थित आहेत. मैदान फार मोठं असल्याने ते रिकामं वाटत आहे, अशा अर्थाचं विधान केलं. न्यूझीलंडने हा सामना 14 ओव्हर आणि 9 विकेट्स राखून जिंकला. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हिड कॉन्वे आणि युवा फलंदाज रचिन रविंद्र यांनी दमदार खेळी करत 270 हून अधिक धावांची पार्टरनशीप करत सामना जिंकून दिला.