सेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी

World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळून टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2023, 12:37 PM IST
सेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी  title=

World Cup Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपचा अंतिम सामना एका दिवसावर आला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी वर्ल्ड कप 2023 ची फायनल खेळवली जाईल. 5 वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी भारत भिडणार आहे. टिम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना गमावला नाही. सलग 10 सामने जिंकलेल्या टिम इंडियासमोर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान आहे. अंतिम सामन्यापूर्वी टिम इंडियाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा साऱ्यावर पाणी फिरण्याची वेळ येऊ शकते. टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया. 

कॅच आणि फिल्डिंगमध्ये चूक नको 

टिम इंडियामध्ये फिल्डिंगसाठी जडेजासारखा सुपरस्टार खेळाडू आहे. पण असे असतानाही फिल्डिंगमध्ये चुका दिसल्या आहेत. अशीच चूक सेमीफायनलमध्ये 28 व्या ओव्हरला झाली. त्यावेळी मोहम्मद शमीकडून विलियमसनची कॅच सुटली. यानंतर काही वेळातच 33 व्या ओव्हरला शमीने भेदक गोलंदाजी करत विलियमसनला आऊट केले. पण कॅच सुटल्याची चर्चा वारंवार होत राहिली. विलियमसन टिकून राहिला असता तर भारताला मॅच जिंकणे कठीण झाले असते. अशाप्रकारे फिल्डिंगमध्येदेखील चौके वाचवावे लागणार आहेत. 

पार्टनरशिप बनू न देणे 

सेमीफायनलमध्ये डेरेल मिचेल आणि केन विलियमसन यांच्यात मोठी भागीदारी झाली. ही भागीदारी वाढतच चालली होती. अशी पार्टनरशिप होऊ न देणे हे टीम इंडियासमोर आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया संघातदेखील असे अनेक खेळाडू आहेत, जे मोठी खेळी करु शकतात. स्मिथ आणि लाबुशेनवर नजर ठेवायला हवी. त्यांना लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवायला हवा.

मिशेल मार्शला टिकू न देणे 

ऑस्ट्रेलियाचा दमदार बॅटर मिशेल मार्श सध्या फॉर्ममध्ये आहे. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो झिरोवर आऊट झाला. पण त्याला आऊट करण्यासाठी तगडी रणनिती बनवण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाची टिम हा सामना हारणार नाही, असे एका पॉडकास्टमध्ये मिचेल मार्शने म्हटले होते. ऑस्ट्रेलिया 450 रन्सवर 2 विकेट गमावेल तर भारताची टिम 65 रन्सवर ऑलआऊट होईल,अशी भविष्यवाणी त्याने केली आहे. आता भारत लवकरच ही भविष्यवाणी खोटी ठरवून दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

स्टार्क-हेझलवूडपासून संभाळून

ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार गोलंदाज मिचेल स्टार्क हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याचा दबदबा विरोधी फलंदाजांमध्ये कायम असको. स्टार्कला खूप सावधपणे खेळावे लागेल. स्टार्कसोबत हेझलवूड आणि कमिन्स यांनाही कमी लेखण्याची चूक करता कामा नये.

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

मॅक्सवेल आणि वॉर्नरवर नजर

ग्लेन मॅक्सवेलने या विश्वचषकातील सर्वात शानदार खेळी खेळली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने क्रिकेट एक्सर्ट्सना तर आश्चर्यचकित केलेच तर संपूर्ण सामन्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या सुरुवातीला वॉर्नर वेगवान धावा करतो. ज्यामुळे कोणत्याही संघाला बॅकफूटवर टाकता येते.