T20 WC 2022: "वर्ल्ड कप हमारा है घर..." युजवेंद्र चहलनं शेअर केलेल्या गाण्यावर पत्नी धनश्री वर्माने केला डान्स, पाहा Video

T20 World Cup Song Dhanashree Verma Dance: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली असून भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत असणार आहे. हायव्होल्टेज सामना 23 ऑक्टोबर 20222 रोजी मेलबर्न मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे खेळाडूंवर वेगळाच दबाव असतो.

Updated: Oct 20, 2022, 07:24 PM IST
T20 WC 2022: "वर्ल्ड कप हमारा है घर..." युजवेंद्र चहलनं शेअर केलेल्या गाण्यावर पत्नी धनश्री वर्माने केला डान्स, पाहा Video title=

T20 World Cup Song Dhanashree Verma Dance: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली असून भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत असणार आहे. हायव्होल्टेज सामना 23 ऑक्टोबर 20222 रोजी मेलबर्न मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे खेळाडूंवर वेगळाच दबाव असतो. भारतीय संघ सुपर 12 च्या ब गटात आहे. या गटात पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड हे संघ आहेत. दरम्यान भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं इन्स्टाग्रामवर एक वर्ल्डकप गाणं शेअर केलं आहे.

'बल्ला चला, छक्का लगा... ये कप हमारा है घर लेकर आ...' असे गाण्याचे बोल आहेत. या व्हिडीओत चहल वर्ल्डकपची जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्यानंतर संघातील इतर खेळाडूंना भेटत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चहलच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

युजवेंद्र चहलने शेअर केलेलं गाणं पत्नी धनश्री वर्मानंही इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. मात्र या व्हिडीओत बदल केला आहे. बॅकग्राउंडला वर्ल्डकपचं गाणं सुरु आहे. मात्र धनश्री या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिने टीम इंडियाची ब्लू जर्सी परिधान केली आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.