Mitchell Marsh: वर्ल्डकप ट्रॉफी वादावरून मिचेल मार्शच्या अडचणी वाढल्या; भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल

Mitchell Marsh: मार्श वर्ल्डकपच्या चमकणाऱ्या ट्रॉफीवर पाय ठेऊन बसला असल्याचं दिसून येतंय. या फोटोमुळे भारतीय चाहत्यांनी मार्शवर टीका करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता अशातच मार्शच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येतेय. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 25, 2023, 07:27 AM IST
Mitchell Marsh: वर्ल्डकप ट्रॉफी वादावरून मिचेल मार्शच्या अडचणी वाढल्या; भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल title=

Mitchell Marsh: गेल्या रविवारी ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताचा वनडे वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये पराभव केला. या पराभवासह टीम इंडियाच्या चाहत्यांच्या सर्वच आशा मावळल्या. दरम्यान या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोमध्ये मार्श वर्ल्डकपच्या चमकणाऱ्या ट्रॉफीवर पाय ठेऊन बसला असल्याचं दिसून येतंय. या फोटोमुळे भारतीय चाहत्यांनी मार्शवर टीका करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता अशातच मार्शच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येतेय. 

मिचेल मार्शविरोधात गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील एका आरटीआय कार्यकर्त्याने मिशेल मार्श याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये असं म्हटलंय की, मिचेल मार्शने ज्या प्रकारे वर्ल्डकप ट्रॉफी पायाखाली ठेवली त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

मार्शच्या कृत्यावर चाहते संतापले

वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम ट्रॉफी घेऊन ड्रेसिंग रूममध्ये गेली आणि खेळाडूंनी फोटो शूट केलं. यावेळी काही खेळाडूंनी फॅमिलीसोबत ट्ऱॉफी घेऊन फोटो काढले. मात्र यावेळी मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून वाद निर्माण झाला. मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिली. या फोटोनंतर भारतीय चाहते मात्र मार्शवर चांगलेच भडकले होते. मार्शचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील केवळ 240 रन्स करू शकली. केएल राहुलने 107 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी तर विराट कोहलीने 54 रन्सची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार रोहितने 31 बॉल्समध्ये 47 रन्स केले. 

दुसरीकडे टीम इंडियाने दिलेल्या 241 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया आक्रमक फलंदाजीच्या मुडमध्ये मैदानात उतरली होती. रोहितने शमीला गोलंदाजी दिली आणि शमीने कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन विकेट्स काढल्या. मात्र ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवलं. अखेरील कांगारूंनी 6 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं.