IPL Auction 2024 : मुंबई इंडियन्स लाडक्या कॅप्टनला रिलीज करणार का? हार्दिक पांड्याची घरवापसी निश्चित?

IPL 2024 Trade Window : रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) रोहितला रिलीज करण्याचा निर्णय कठीण असणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Nov 24, 2023, 11:13 PM IST
IPL Auction 2024 : मुंबई इंडियन्स लाडक्या कॅप्टनला रिलीज करणार का? हार्दिक पांड्याची घरवापसी निश्चित? title=
IPL Auction 2024, Mumbai Indians, Rohit Sharma, Hardik Pandya

Mumbai Indians, IPL 2024: वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावरील जबाबदाऱ्या कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत. टीम इंडियामधून रोहितला पत्ता जवळजवळ कट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता रोहित शर्मा आपल्या लाडक्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला रामराम ठोकणार की काय? असा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पडला आहे. त्याला कारण सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा.. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनसी सोडणार असून गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबईचं नेतृत्व करू शकतो, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत.

रोहित शर्माने नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनल एक्झिटनंतर एकही टी- 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटमधून बाहेर पडलाय, हे निश्चित झालंय. मात्र, दुसरीकडे रोहित अजूनही आयपीएल खेळतो. मुंबईला त्याने पाचवेळी विजयाची चव चाखण्याची संधी दिलीये. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे समानार्थी शब्द झालेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, आता मुंबई नवी जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर देणार का? असा सवाल विचारला जातोय.

गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या बदल्यात रोहित शर्मा किंवा जॉफ्रा आर्चर यांना मागितलं होतं, अशी माहिती समोर आली होती. मात्र, त्यावर अधिकृत शिक्कमोर्तब अजूनही झालं नाही. हार्दिकला संघात सामिल करून घेऊन मुंबई इंडियन्स नवा कॅप्टन तयार करतोय का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. मात्र, हार्दिक पांड्यासाठी मुंबई जॉफ्रा आर्चरवर बाजी लावू शकते. त्यामुळे हार्दिक मुंबईच्या संघात आल्यास आश्चर्य वाटायला नको.

आणखी वाचा - IPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) रोहितला रिलीज करण्याचा निर्णय कठीण असणार आहे. हार्दिक पंड्याने आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर 2022 मध्ये पहिल्याच पर्वात गुजरात टायटन्सच्या संघाला जेतेदपद मिळवून दिलेलं. तर 2023 मध्ये गुजरातचा संघ फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून पराभूत झाला होता. त्यामुळे गुजरात आपल्या कॅप्टनला रिलीज करून भविष्य अंधारात ठेवतंय का? अशी शंका क्रिडातज्ज्ञांनी व्यक्त केलीये.