मुंबई : पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदनं रियाधमध्ये झालेल्या वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.
यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होतोय. 2017 मध्ये त्याला फारस यश मिळालं नव्हतं. मात्र, आनंदची पत्नी अरुणानं त्याला या खतडर प्रवासात मोलाची साथ दिली. आनंदनं त्याच्या या यशाचं श्रेय अरुणाला दिलंय. वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी अरुणानचं प्रोत्साहन दिल्याचं आनंदनं प्रांजळपणे कबुल केलं. या टुर्नामेंटपूर्वी आनंदनं आपल्या कुटुंबीयांसह सुट्टी घालवण्याचे प्लॅन केले होते.
Thanks everyone. Mildly put, I am very pleased with my play! Happy 2018. Now family time till Wijk. This picture is for my wife, she has asked me to bring the medals back very safely. This is proof! pic.twitter.com/zkwE41tanm
— Viswanathan Anand (@vishy64theking) December 31, 2017
मात्र, त्याची पत्नी अरुणानं आनंदला या टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. आनंद या वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आणि त्यानं याचं अजिंक्यपदही पटकावलं.