WTC Final : टॉसदरम्यान रोहित शर्माच्या 'त्या' निर्णयावर संतापले चाहते, हिटमॅनने असं काय केलं?

IND vs AUS WTC Final :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यावेळी रोहितच्या एका निर्णयावर चाहते मात्र संतप्त झालेत.

Updated: Jun 7, 2023, 04:38 PM IST
WTC Final : टॉसदरम्यान रोहित शर्माच्या 'त्या' निर्णयावर संतापले चाहते, हिटमॅनने असं काय केलं?  title=

IND vs AUS WTC Fina l: अखेर क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपलीये. बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येतोय. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा सामना रंगला असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकलाय. या सामन्यात रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यावेळी रोहितच्या एका निर्णयावर चाहते मात्र संतप्त झालेत.

या सामन्यात टीम इंडियाने जी प्लेईंग 11 निवडली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. तिथल्या कंडीशन आणि पीचला अनुसरून कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी प्लेईंग 11 निवडली आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin ) ला बाहेर ठेवण्याचा घेतलेला निर्णय चाहत्यांना पटला नाहीये. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये रविचंद्रन अश्विन ( Ravichandran Ashwin ) आणि ईशान किशन ( Ishan Kishan ) यांना बाहेर ठेवण्यात आलंय. या दोन्ही प्रमुख खेळाडूंना बाहेर ठेवण्याचा निर्णय चाहत्यांना पटला नसून याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा रंगू लागलीये. 

सध्याच्या काळात सर्वोत्तम ऑफस्पिनर म्हणून रविचंद्रन अश्विनचं नाव घेतलं जातं. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात अश्विनला स्थान देण्यात आलेलं नाही. टीम इंडियाला अंतिम फेरीत नेण्यासाठी रविचंद्रन अश्विनचा मोठा वाटा होता. असं असतानाही टीममध्ये त्याला संधी न मिळणं हे चाहत्यांना पटलं नाही. 

कर्णधार रोहित शर्माने टॉसच्या वेळी सांगितलं की, रविचंद्रन अश्विनसारख्या खेळाडूला टीममधून हा कठीण निर्णय आहे. तो अनेक वर्षांपासून सामना जिंकणारा महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. 

दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.