ICC World Test Championship : टी-20 वर्ल्डकप 2022 (T20 world cup) नंतर क्रिकेट जगतात आता टेस्ट (Test match) आणि वनडे (ODI) सामन्यांची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज (Australia vs West Indies) तसंच पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यामध्ये रंजक सामने पहायला मिळाले. यावेळी इंग्लंड टीम आणि पाकिस्तान टीममध्ये झालेल्या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2023 मध्ये मोठी उलथा-पालथ झाली आहे. मुख्य म्हणजे याचा फायदा भारताला झाला आहे.
WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC Points Table) भारताला चांगलाच फायदा झाला आहे, याचं कारण म्हणजे इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. कारण भारत आणि पाकिस्तान या पॉईंट्स टेबलमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. दोघांमध्ये केवळ 6 अंकांचा फरक आहे. अशामध्ये जर पाकिस्तान हा सामना जिंकला असता तर त्यांना 12 पॉईंट्स मिळाले असते आणि ड्रॉ झाल्यानंतर पाकिस्तानच्या खात्यामध्ये केवळ 6 पॉईंट्स असते.
अशामुळे पाकिस्तान टीम इंडियापेक्षा पुढे गेली असती, मात्र इंग्लंड टीमच्या विजयाने हे शक्य झालं नसतं. ताज्या WTC च्या अनुसार, भारत 52.08 परसेंटेज पॉइंट्सोबत चौथ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका (53.3) तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया (72.7) ने पहिल्या क्रमांकावर तर, दक्षिण आफ्रिका (60) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चौथ्या नंबरवर असूनही टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची दाट शक्यता मानली जातेय. यासाठी टीम इंडियाला आगामी 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. जर टीम इंडिया यामध्ये यशस्वी झाली तर पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक देणार आहे.
सध्या तरी भारताला बांगलादेशविरूद्ध टेस्ट सिरीज खेळायची आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबतही टेस्ट सिरीज खेळावी लागणार आहे.