WTC - भारतीय संघाची घोषणा, अशी असणार भारताची Playing XI

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा

Updated: Jun 17, 2021, 07:50 PM IST
WTC - भारतीय संघाची घोषणा, अशी असणार भारताची Playing XI

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने अंतिम खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) दरम्यान इंग्लंडच्या साऊथेम्पटनमध्ये उद्यापासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ट्विट करत अकरा खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

भारतीय संघात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजाना संधी देण्यात आली असून रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन आश्विन या दोन्ही फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

सलामीला रोहित शर्माबरोबर शुभमन गिल या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. तर सध्यात फॉर्मात असलेल्या रिषभ पंतही टीमचा भाग असणार आहे.

विराटसेनेचे 11 शिलेदार

विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.