नवी दिल्ली : रेसलिंग विश्वातील प्रसिद्ध स्टार जॉन सीना चांगलाच अडचणीत सापडला आहे. जॉन सीनावर फोर्ड या अमेरिकन का कंपनीने केस ठोकली आहे. जॉन सीनावर ही केस कॉन्ट्रॅक्ट तोडून आपली फोर्ड कार विकल्याने करण्यात आलीये.
जॉन सीनाने फोर्ड जीडी कार कंपनीच्या परवानगी शिवाय विकली. पण कॉन्ट्रॅक्टनुसार जॉन सीनाला ही कार त्याच्याकडे किमान दोन वर्षे ठेवायची होती. फोर्डनुसार, जॉन सीनाने ही कार ५ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच ३ कोटी २२ लाख रूपयांमध्ये विकली आहे.
आता फोर्ड कंपनीने कार विकून आलेल्या रक्कमेवर आपला दावा सांगितला आहे. ती रक्कम कंपनीला देण्यास सांगितले आहे. फोर्ड कंपनीने या कारचे केवळ १ हजार मॉडल्सच बनवले होते. फोर्डनुसार, कॉन्ट्रॅक्ट तोडून ही कार विकल्याने कंपनीची ब्रॅन्ड व्हॅल्यू, अॅम्बेसेडर अॅक्टीव्हीटी आणि कस्टमर गुडविलला नुकसान पोहचलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जॉन सीनाने कार आणि त्याची प्रॉपर्टी कर्ज फेडण्यासाठी विकली आहे.