नवी दिल्ली : श्रीलंके विरूद्ध तिस-या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा सुरूवात जरा निराशाजनक झाली.
मात्र नंतर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. दोघांनी मैदानाच्या चहुबाजूने दमदार शॉट्स लगावले. दोघांनी तिस-या विकेटसाठी १६७ रन्सची भागीदारी केली. त्यासोबतच हे वर्ष मुरली विजयसाठीही खास राहिलं. त्याने ६ सामन्यांमध्ये ४५७ रन्स केले.
टीम इंडियाकडून सलामी फलंदाज म्हणून सर्वात जास्त शकत लगावणा-या यादीत मुरली विजय तिस-या स्थानावर पोहोचला आहे. हे त्याचं टेस्ट करिअरचं ११वं शतक आहे. भारताकडून सलामी फलंदाज म्हणून सर्वात जास्त शतकं सुनील गावस्कर यांनी लगावले आहेत. गावस्करने टेस्ट करिअरमध्ये एकूण ३३ शकतं लगावली आहेत.
दुस-या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग हा आहे. विरेंद्र सेहवान त्याच्या टेस्त करिअरमध्ये सलामी फलंदाज म्हणून टीम इंडियासाठी २२ शतकं लगावली आहेत. आता तिस-या क्रमांकावर मुरली विजय हा आला आहे.
गेल्या चार वर्षात वर्ल्ड क्रिकेटमध्ये टेस्ट सामन्यांमध्ये सर्वात यशस्वी फलंदाजांबाबत बोलायचं तर या यादीत मुरली विजय दुस-या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नरचं आहे. वॉर्नरने २०१३ पासून ते आत्तापर्यंत सलामी फलंदाज म्हणून १७ शतकं लगावले आहेत. तेच २०१३ पासून ते आतापर्यंत मुरली विजयने १० शतकं लगावली आहे. तिस-या क्रमांकावर डीन एल्गर आहे. त्याने गेल्याच ४ वर्षात ९ शतकं केली आहे.
मुरली विजयने या सामन्याआधी ५२ टेस्ट सामन्यांमध्ये ३५३६ रन्स केले आहेत. तेच १७ वनडे सामन्यांमध्ये मुरलीने १ अर्धशतकच्या मदतीने ३३९ रन केले आहेत. मुरलीने ९ टी-२० सामन्यांमध्ये १६९ रन्स केले आहेत.