कर्णधारपदाचा निर्णय झालाच! अनपेक्षित खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा...

मुख्य म्हणजे, टीम मॅनेजमेंटने सिनियर खेळाडूंकडे दुर्लक्ष करून या तरूण खेळाडूला कर्णधारपदाची धुरा दिल्याने, अनेकजण या निर्णयाने हैराण आहेत. 

Updated: Dec 11, 2022, 04:21 PM IST
कर्णधारपदाचा निर्णय झालाच! अनपेक्षित खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा... title=

Yash Dhull To Lead Delhi : येत्या 13 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy) सुरुवात होणार आहे. 17 दिवस चालणाऱ्या या टूर्नामेंटमध्ये 38 टीम्स सहभागी होणार आहे. यामध्ये सगळ्या टीम्सला ए, बी, सी आणि डी या ग्रुप्समध्ये विभागलं जाणार आहे. दरम्यान ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी भारतीय अंडर 19 टीमला (Under 19 Team) विजेता बनवणाऱ्या 20 वर्षीय युवा खेळाडू यश ढुल (Yash Dhull) कडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यशला दिल्लीच्या टीमचं कर्णधारपद (delhi team captain) सोपवण्यात आलं आहे.

मुख्य म्हणजे, टीम मॅनेजमेंटने सिनियर खेळाडूंकडे दुर्लक्ष करून यशला कर्णधारपदाची धुरा दिल्याने, अनेकजण या निर्णयाने हैराण आहेत. 

Yash Dhull कडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा 

परवापासून रणजी ट्रॉफीला सुरुवात होणार असून यासाठी दिल्लीने कर्णधार आणि टीमची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्लीच्या कर्णधारपदी यश ढुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दिल्लीच्या टीममध्ये भारताकडून 100 हून अधिक टेस्ट सामने खेळणारा ईशान किशन तसंच कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा नितिश राणा देखील उपस्थित आहेत. या दोन खेळाडूंकडे कर्धणारपद न देता यशकडे नेतृत सोपवल्याने मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

डीडीसीएच्या निवड समितीच्या एका सदस्याने पीटीआयला असं सांगितलं की, कुठे ना कुठेतरी आम्हाला निर्णय घ्यावा लागणारच होता. सध्या तरी यशकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. 

रणजी ट्रॉफीमध्ये ऋषभ पंत दिल्लीकडून खेळतो. मात्र तो बांगलादेशाविरूद्धच्या 2 टेस्ट सामने खेळणार असल्याने रणजीला तो उपस्थित नसेल. 

दिल्लीची रणजी टीम

यश ढुल (कर्णधार), हिम्मत सिंह, ध्रुव शौरी, अनुज रावत, वैभव रावल, ललित यादव, नीतीश राणा, आयुष बडोनी, ऋतिक शौकीन, शिवांक वशिष्ठ, विकास मिश्रा, जोंटी सिद्धू, इशांत शर्मा, मयंक यादव, हर्षित राणा, सिमरजीत सिंह, लक्ष्य थरेजा, प्रांशु विजयरान

केरळ टीमच्या कर्णधारपदी Sanju Samson ची वर्णी

भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला रणजी ट्रॉफीमध्ये केरळच्या 2 सामन्यांसाठी कर्णधार बनवण्यात आलंय. मुख्य म्हणजे, संजूला कर्णधारपदाचा चांगलाच अनुभव आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची कमान सांभाळली होती. इतकंच नाही तर त्याने आयपीएल 2022 मध्ये टीमला फायनलपर्यंतही पोहोचवलं होतं.

Suryakumar Yadav देखील खेळणार रणजी

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव आता रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy 2022-23) च्या सीझनमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. 27 डिसेंबर रोजी सौराष्ट्र विरूद्ध पहिला सामना खेळला जाणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सुर्यकुमारचा जलवा पहायला मिळू शकतो.

13 डिसेंबर पासून सुरु होतेय रणजी ट्रॉफी

बीसीसीआयकडून दरवर्षी रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात येतं. ज्यामध्ये तरूण खेळाडू त्यांच्या उत्तम खेळाचं प्रदर्शन करतात. रणजी ट्रॉफी 2022-23 चा सिझन 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ज्याचा अंतिम सामना 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी यांच्यामध्ये रंगणार आहे. अशामध्ये सर्वांचं लक्ष Suryakumar Yadav च्या खेळावर असणार आहे.