कोण आहे यशस्वी जयस्वालची गर्लफ्रेंड? 3 वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये

यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात शतक लगावले होते यावेळी मॅडी हॅमिल्टन ही स्टेडियममध्ये हजर होती

पुजा पवार | Updated: Sep 10, 2024, 05:29 PM IST
कोण आहे यशस्वी जयस्वालची गर्लफ्रेंड? 3 वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये    title=
(Photo Credit : Social Media)

टीम इंडियाचा विस्फोटक ओपनर आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल हा सध्या सुपरस्टार बनला आहे. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वी जयस्वालने आपली प्रतिभा सिद्ध करून क्रिकेट विश्वात नाव कमावलं. 22 वर्षांचा यशस्वी जयस्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच आयपीएलमध्ये सुद्धा धावांचा पाऊस पाडतो, त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 2 शतकांचा समावेश असून टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने 3 तर टी 20 क्रिकेटमध्ये एक शतक ठोकलं आहे. 

आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालने 15 सामन्यांमध्ये 435 धावा केल्या. आयपीएल दरम्यान यशस्वी जयस्वाल त्याची कथित गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टन हिच्या सोबत दिसला होता. यशस्वी जयस्वाल अनेकदा  मॅडी हॅमिल्टन आणि तिच्या कुटुंबासोबतचे व्हिडीओमध्ये दिसतो. यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात शतक लगावले होते यावेळी मॅडी हॅमिल्टन ही स्टेडियममध्ये हजर होती आणि ती आनंदात सेलिब्रेशन करत असल्याचे पाहायला मिळाले. 

कोण आहे मॅडी हॅमिल्टन? 

यशस्वी जयस्वाल हा मॅडी हॅमिल्टन सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप यशस्वी किंवा मॅडीने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केलेला नाही. परंतु अशी माहिती मिळतेय की, मॅडी हॅमिल्टन आणि यशस्वी हे दोघे एकमेकांना तीन वर्षांपासून डेट करत आहेत. मॅडी हॅमिल्टन ही ब्रिटनची असून सध्या ती शिक्षण घेत आहे. मॅडी अनेकदा भारताच्या सामन्यांमध्ये टीमला चिअर करताना दिसते. 

हेही वाचा : भारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्! रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स

 

हॅमिल्टनच्या भावाचा मित्र आहे यशस्वी : 

रिपोर्ट्सनुसार हैदराबाद येथे खेळवण्यात आलेल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची जर्सी घालून मॅडी हॅमिल्टन पोहोचली होती. आयपीएल सीजनमध्ये सुद्धा तिला राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून यशस्वीला चिअर करताना पाहण्यात आले होते. जयस्वाल हा हॅमिल्टनच्या भावाचा चांगला मित्र आहे. त्याच्यामुळेच मॅडी आणि तिची ओळख झाल्याचे सांगण्यात येते.