भारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्! रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स

भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 13 टेस्ट सामने खेळले गेले यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले तर उर्वरित दोन सामने हे ड्रॉ झाले. 

पुजा पवार | Updated: Sep 10, 2024, 04:34 PM IST
भारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्!  रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स  title=
(Photo Credit : Social Media)

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे.  19 ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर सीरिजचा पहिला सामना रंगणार असून दुसरा सामना हा कानपुर येथील ग्रीन पार्कवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आतापर्यंत भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 13 टेस्ट सामने खेळले गेले यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले तर उर्वरित दोन सामने हे ड्रॉ झाले. 

आतापर्यंत भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सामन्यात भारताचं वर्चस्व राहिलं असलं तरी बांगलादेशला हल्ल्यात घेणं टीम इंडियाला परवडणारं नाही. याच कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने पाकिस्तानचा दौरा केला होता. या दरम्यान झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने धूळ चारून सिरीज जिंकली. त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. 

बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये होऊ शकतात 5 महारेकॉर्ड : 

सचिन- द्रविडच्या क्लबमध्ये विराटची एंट्री : 

टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली एक मोठा पराक्रम करण्याच्या अगदी जवळ आहे. बांगलादेश विरुद्ध सीरिजमध्ये किंग कोहलीने जर 152 धावा केल्या तर तो टेस्ट क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करेल. जर असे झाले तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकरनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये 9 हजार धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल.  

हिटमॅनच्या निशाण्यावर सेहवागचा रेकॉर्ड : 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये केवळ 7 सिक्स मारून सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी करू शकतो. माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने 103 टेस्ट सामन्यात 90 सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये एवढे सिक्स ठोकणारा सेहवाग हा भारताचा एकमेव फलंदाज आहे. मात्र आता बांगलादेश विरुद्ध हिटमॅनने 7 सिक्स ठोकले तर तो या रेकॉर्डशी बरोबरी करू शकतो. रोहित शर्माने आतापर्यंत 54 टेस्ट सामने खेळले असून यात त्याने एकूण 84 टेस्ट सामने खेळले आहेत. 

विराट कोहली मोडू शकतो डॉन ब्रेडमॅनचा रेकॉर्ड  : 

विराट कोहली तब्बल 9 महिन्यांच्या ब्रेकनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. बांगलादेश विरुद्ध जेव्हा विराट खेळायला उतरेल तेव्हा त्याची नजर ही डॉन ब्रेडमॅनच्या रेकॉडवर असेल. विराटच्या नावावर सध्या 29  टेस्ट शतक आहेत. जर विराट बांगलादेश विरुद्ध शतक ठोकण्यात यशस्वी झाला तर तो डॉन ब्रेडमॅनच्या 29  शतक ठोकण्याच्या रेकॉर्डला मागे टाकेल.  टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक सचिन तेंदुलकर याने ठोकेल आहेत. सचिनने टेस्टमध्ये एकूण 51 शतक लगावली आहेत. 

अश्विनकडे जहीर खानचा रेकॉर्ड मोडण्याची संधी :

टीम इंडियाचे दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनचे माजी वेगवान गोलंदाज जहीर खानचा रेकॉर्ड मोडू शकतो. जाहीर हा भारत - बांगलादेशमध्ये झालेल्या टेस्ट सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. जहीरने 7 टेस्ट सामन्यात एकूण 31 विकेट्स घेतल्या.  तर अश्विनने बांगलादेश विरुद्ध 6 टेस्ट सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत. जर दोन टेस्ट सामन्यात अश्विनने बांगलादेशच्या 9 विकेट्स घेतल्या तर तो बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. 

पुजारा आणि द्रविडला याबाबतीत मागे टाकू शकतो विराट : 

विराट कोहली हा बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चेतेश्वर पुजाराला मागे टाकू शकतो. पुजाराने बांगलादेश विरुद्ध 5 टेस्ट सामन्यांमध्ये एकूण 468 धाव केल्या आहेत. बांगलादेश विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राहुल द्रविडने बांगलादेश विरुद्ध 7 टेस्ट सामने खेळताना एकूण  560 धावा केल्या आहेत. विराटला द्रविडचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 124 धावांची आवश्यकता असेल. 

बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया : 

रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.