IND vs PAK : टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup) पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा (Ind vs Pak) संघ आमनेसामने खेळत आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावर नाणेफेक (Toss) गमावल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानचा निम्मा संघ 100 धावापूर्वीच डगआऊटमध्ये पोहोचला. मात्र शान मसूदने (shan masood) संघासाठी एकाकी झुंज दिली. मात्र, यादरम्यान मसूदलाही जीवनदानही मिळालं. त्याचा फायदा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र रोहित शर्माने युझवेंद्र चहलच्या (yuzvendra chahal) जागी संधी दिलेल्या रविचंद्रन अश्विनवर (ravichandran ashwin) आता टीका करण्यात येत आहे. (Yuvraj singh got angry after Ashwin dropped shan masood catch)
पाकिस्तानच्या आठव्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर मसूदला हे जीवनदान मिळालं. तिसर्या चेंडूवर मसूदने फाइन लेगच्या दिशेने एक शॉट खेळला आणि तिथे रविचंद्रन अश्विन होता. मात्र अश्विनला (ravichandran ashwin) झेल घेता आला नाही. अश्विनने झेल सोडल्याबद्दल भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (yuvraj singh) नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनमुळे ड्रॉप मसूदला (shan masood) मिळालेलं जीवनदान पाकिस्तानसाठी फायद्याचं ठरू शकतं, असा विश्वास युवराजला आहे.
मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये शान मसूदने शॉर्ट बॉलवर पुल शॉट मारला आणि फाइन लेगवर उभा असलेला अश्विन बॉलच्या दिशेने धावला. तिथे त्याने बॉल पकडला, पण त्याच्या हातात येण्याआधी बॉल जमिनीला स्पर्श करत होता. पण अश्विनला वाटले की त्याने झेल घेतला आहे. मात्र, मसूदने क्रीज सोडली नाही आणि थर्ड अंपायरकडे गेला. त्यानंतर अश्विनच्या हातात चेंडू येण्यापूर्वीच चेंडू जमिनीला स्पर्श झाल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले.
Good try Ashwin @ashwinravi99 pic.twitter.com/PsmD5AQr4P
— FarShan (@FarShan777) October 23, 2022
यानंतर चिडलेल्या युवराजने याबाबत एक ट्विट केलं आहे. "मला वाटतं रविचंद्रन अश्विनच्या झेल सोडल्याने सामना पाकिस्तानच्या बाजूने वळला आहे. भारत या सामन्यात पुनरागमन करू शकेल अशी आशा आहे," असे युवराजने म्हटलं आहे.
I guess the drop catch by r Ashwin ! Has changed the momentum of the game in favour of Pakistan ! Catches win matches !! Hopefully india can pull it back !!’ Come on lads #PakVsInd
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 23, 2022
दरम्यान, अश्विनने झेल सोडल्यानंतरही पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला टार्गेट केले आणि त्याला चीटर म्हटले. अश्विनला नियमांनुसार खेळ खेळायला आवडते आणि खेळताना मैदानावर असे काही करतो, ज्यावर खूप वाद होतात.