युवराज सिंगने केला विश्वविक्रम

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याला आज आयसीसीच्या टूर्नामेंटची सातवी फायनल खेळण्याचा मान मिळाला आहे. अशा पद्धतीने सात फायनल खेळणारा तो पहिला बॅट्समन ठरणार आहे. आज ओव्हल मैदानात खेळण्यात येणाऱ्या अंतिम सामनात युवराजला स्थान मिळाल्याने त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Updated: Jun 18, 2017, 04:37 PM IST
युवराज सिंगने केला विश्वविक्रम title=

बर्मिंघम : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याला आज आयसीसीच्या टूर्नामेंटची सातवी फायनल खेळण्याचा मान मिळाला आहे. अशा पद्धतीने सात फायनल खेळणारा तो पहिला बॅट्समन ठरणार आहे. आज ओव्हल मैदानात खेळण्यात येणाऱ्या अंतिम सामनात युवराजला स्थान मिळाल्याने त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
श्रीलंकाचा कुमार संगाकारा आणि महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आणि भारताचा युवराज सिंग यांनी आयसीसी टूर्नामेंटमध्ये ६-६ वेळा फायनल खेळल्या आहेत.
युवराजचा वनडे करिअर नेहमीच उत्कृष्ट राहीला आहे. युवराज सिंगने ३०० सामने खेळत ८६२२ धावा केल्या आहेत. युवराजने वनडे करिअरमध्ये ५२ अर्धशतक आणि १४ शतक केले आहेत.