दोघांत तिसरा? युझवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यामध्ये 'या' खेळाडूचं घेतलं जातंय नाव!

युझवेंद्र चहलने धनश्री आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आहे की नाही या चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केलाय.

Updated: Aug 19, 2022, 12:31 PM IST
दोघांत तिसरा? युझवेंद्र आणि धनश्रीच्या नात्यामध्ये 'या' खेळाडूचं घेतलं जातंय नाव! title=

मुंबई : धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांची जोडी चाहत्यांना फार आवडते. मात्र नुकतंच धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चहल हे आडनाव हटवून सर्वांना आश्चर्यचकित केलं. यां दोघांमध्ये काय सुरु आहे? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगलीये. दरम्यान या चर्चेमध्ये सातत्याने टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयर अय्यरचं नाव समोर येताना दिसतंय.

श्रेयस अय्यर होतोय ट्रोल

युझवेंद्र चहलने धनश्री आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आहे की नाही या चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केलाय. अशातच सोशल मीडियावर या दोघांची कृती पाहून चाहते भारतीय युवा फलंदाज श्रेयस अय्यरला ट्रोल करताय.

मुख्य म्हणजे धनश्री ही डान्सर आहे. तिचे आणि श्रेयस अय्यर अनेकदा एकत्र डान्सचे व्हिडियोही व्हायरल झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आलेल्या कमेंट्सच्या माध्यमातून, श्रेयसमुळेच धनश्री आणि युझवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा युझर्सचा समज झालाय.

नेमकं प्रकरणं काय?

काही दिवसांपूर्वी धनश्री वर्माने इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून तिचं आडनाव धनश्री वर्मा चहलवरून बदलून धनश्री वर्मा केल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर, युझवेंद्र चहलने एका  इन्स्टा स्टोरीमध्ये टाकलेल्या फोटोमुळे त्याचे चाहते आणखी गोंधळात सापडले होते. या फोटोमध्ये एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे, असं म्हटलं होतं.

त्यानंतर युझवेंद्र चहलने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक पोस्ट केली आहे. धनश्री वर्माच्या इन्स्टा पोस्टनंतर दोघांमध्ये काही वाद झाला का, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर चहलने सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

युझवेंद्र चहलने त्यांच्या एका इन्स्टा स्टोरीद्वारे त्यांच्या नात्यासंदर्भातील बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. "तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया त्या येथेच संपवा. तुम्हाला जर काही माहित नसेल,तर यासंदर्भात पुढे जाऊ नका," असं चहलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.