India !5 Member Squad For Word Cup 2023: भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताच्या 15 जणांच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चीफ सिलेक्टर आजित आगरकर यांनी याची घोषणा केली आहे. टीम इंडियामध्ये चार प्रमुख फलंदाज, दोन विकेटकिपर फलंदाज, चार ऑलराऊंडर्स आणि चार प्रमुख गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या टीम इंडियामध्ये फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे. अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या त्रिकुटाला पुन्हा एकदा संधी दिलीये. मात्र, आर आश्विन आणि युझी चहलला संघात घेण्यात आलं नाही. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार अन् फिरकीमध्ये जोर नसल्याचं दिसत असल्याने आता क्रिडातज्ज्ञांचं टेन्शन वाढलंय. अशातच आता वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्ट न झाल्याने यझुवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आशिया कप संघासाठी संधी न मिळाल्याने यझुवेंद्र चहलने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने देवधर्माचा रस्ता पकडलेला दिसतोय. त्यामुळे त्याला आता वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता टीममध्ये त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी त्याला आता निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर मिम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
BCCI to Yuzi Chahal in every Icc tournament pic.twitter.com/iRWzFHYVBE
— Abhishek (@be_mewadi) September 5, 2023
@yuzi_chahal please retire and start playing International leagues..!! You should not waste any more time waiting for your name in playing x1 for India..!!! You deserve a better treatment..!!!
— Kunjan (@kuns1504) September 5, 2023
#YuzvendraChahal not in the CWC squad.. he may have run a rough patch but ignoring leg spinner of his calibre will turn out to be negative for ICT. @yuzi_chahal #CWCSquad
— Mohit Jain (@mjainrox) September 5, 2023
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.