PICS: लग्नानंतर झहीर-सागरिकाने मित्रांसोबत केली डान्स पार्टी

क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाले. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 8, 2017, 04:07 PM IST
PICS: लग्नानंतर झहीर-सागरिकाने मित्रांसोबत केली डान्स पार्टी  title=
Image: Instagram

नवी दिल्ली : क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाले. 

झहीर आणि सागरिका यांनी सकाळी कोर्ट मॅरेज केलं. यावेळी दोघांचे नातेवाईक आणि जवळील मित्र परिवार उपस्थित होता. 

झहीर खान आणि सागरिका यांनी गुरुवारी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर रात्री आपल्या जवळच्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय केली.

(फोटोज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

२७ नोव्हेंबरला ग्रँड रिसेप्शन 

दरम्यान, झहीर-सागरिकाच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये २७ नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. मात्र, त्यापूर्वी शनिवारी रात्री या नवविवाहीत जोडप्याने आपल्या मित्रांसोबत एक पार्टी केली. 

दिला आश्चर्याचा धक्का 

याचवर्षी एप्रिल महिन्यात झहीर आणि सागरिका यांचा साखरपूडा झाला होता. साखरपूडा झाल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांना लग्नाच्या तारखेसंदर्भात प्रचंड उत्सुकता लागलेली होती. मात्र, अचानक कोर्ट मॅरेज करत झहीरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

 

Another dancing night #aboutlastnight

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

जहीर-सागरिका यांच्या या पार्टीत क्रिकेट विश्वातल्या आणि बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. क्रिकेटर युवराज सिंग आपली पत्नी हेजल कीचसोबत उपस्थित होता.

या डान्स नाईटमध्ये सागरिकाने फॅशन डिझायनर फाल्गुनी अँड पिकॉकचा ग्रे नेट लेहंगा परिधान केला होता. या ड्रेससोबतच सागरिकाने दागिनेही घातले होते. तर झहीरही सूटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता.

 

Feeling somewhat complete tonight.. And @yuvisofficial makes that happen!! Welcome back my bro... #friendslikefamily

A post shared by Ashish 'Dev' Chowdhry (@ashishchowdhryofficial) on

 

Luv luv luv these two really really adorable ones. This marriage is just 'Ohh sooo perfecttt!'..  Party begins @zaheer_khan34 n @sagarikaghatge 

A post shared by Ashish 'Dev' Chowdhry (@ashishchowdhryofficial) on

झहीर खानने ऑक्टोबर २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने ९२ टेस्ट मॅच खेळत ३११ विकेट्स आणि २०० वन-डे मॅचेस खेळत २८२ विकेट्स घेतले आहेत