बॅट घेऊन मारायला निघालेल्या Sikandar Raza ला आयसीसीने दाखवला नियम, पाहा काय केलं?

ZIM Vs IRE 1st T20I : आयरिश खेळाडू आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यात लाईव्ह सामन्यात मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. आयसीसीने (ICC) सिंकदर रझा याला नियम दाखवला असून त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 10, 2023, 03:32 PM IST
बॅट घेऊन मारायला निघालेल्या Sikandar Raza ला आयसीसीने दाखवला नियम, पाहा काय केलं? title=
ZIM Vs IRE ICC Ban Sikandar Raza

ICC Ban Sikandar Raza : सध्या आयर्लंडचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात खेळवण्यात येत असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या (ZIM vs IRE) मालिकेतील पहिला सामना हरारे इथे खेळवला गेला. या सामना चर्चेत राहिला तो, झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्यामुळे... आयरिश खेळाडू आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यात लाईव्ह सामन्यात मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. या सामन्यात सिंकदरने थेट बॅट उगारल्याचं देखील पहायला मिळालं होतं. अशातच आता आयसीसीने (ICC) सिंकदर रझा याला नियम दाखवला असून त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

क्रिकेटचा सामना रंगात आला की स्लेजिंगला सुरुवात होते. या सामन्यात देखील आयरिश गोलंदाज जोश लिटल (Josh Little) याने रझाशी पंगा घेतला अन् वादाला सुरूवात झाली. तर कर्टिस कॅम्फर याने देखील रझाला डिवचून विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्लेजिंगमुळे रझाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. सामना संपल्यावर प्रकरण शांत झालं. मात्र, या प्रकरणात आयसीसीने कारवाई केली आहे. 

ICC ने केली कारवाई

आयसीसीने सिकंदर रझावर दोन सामन्यांची बंदी (ICC Ban Sikandar Raza For Two Match) घालण्यात आली आहे, ज्यामुळे तो आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या T20 मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर असेल. रझाला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले आहेत. 

फक्त रझाच नाही तर, आयर्लंडच्या जोशुआ लिटल आणि कर्टिस कॅम्पर (Curtis Campher) यांनाही झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट मिळाला. या दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या 15 टक्के दंडही ठोठावण्यात आलाय. खेळाडूच्या दिशेने आक्रमकपणे चार्ज करणे, बॅट दाखवणे आणि अंपायरपासून दूर जाणे असे आरोप सिंकदर रझावर करण्यात आले आहेत.

पाहा Video

झिम्बाब्वे संघाने शेवटच्या चेंडूवर अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सिकंदर रझाने आपल्या संघातर्फे सर्वाधिक 65 धावांचे योगदान दिलं होतं. तर तीन फलंदाजांना घरी पाठवण्याचं काम देखील त्याने केलं. सिकंदरला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.